Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Theme Park at Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारणीसाठी पालिका देणार सरकारला पत्र

Mahalakshmi Race Course

Image Source : www.n.pinterest.com

Theme Park at Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा भाडेकरार 10 वर्षांपूर्वी संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता या भूखंडावर थीम पार्क उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

Theme Park at Mahalakshmi Race Course: मुंबईमध्ये देश विदेशातून अनेक पर्यटक(Tourist) वर्षाला भेट देत असतात. त्यामुळे याठिकणी जागतिक दर्जाचे उद्यान व्हावे यासाठी पालिकेकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा(Mahalakshmi Race Course) भाडेकरार 10 वर्षांपूर्वी संपुष्टात आला आहे. त्यामुळे  आता या भूखंडावर थीम पार्क(Theme Park) उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याकरिता रेसकोर्सचा संपूर्ण भूखंड मुंबई महानगरपालिकेला(BMC) द्यावा अशी मागणी करणारे पत्र महानगरपालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला(State Government) पाठवण्यात येणार आहे. या भूखंडांपैकी फक्त 30 टक्के जागा ही महानगरपालिकेच्या मालकीची आहे.

नूतनीकरणासाठी हवी सरकारची मंजुरी

राज्य सरकारच्या मालकीच्या भूखंडाच्या भाडेकराराचे नूतनीकरण करण्याचे अधिकार महापालिकेला देण्यात आले होते. महालक्ष्मी(Mahalakshmi) येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड रेसकोर्स व्यवस्थापनाला 1914 मध्ये 99 वर्षांच्या भाडेकरारावर दिला होता. हा भाडेकरार 2013 मध्येच संपुष्टात आला असून या जागेवर भव्य असे थीम पार्क उभारण्याचे शिवसेनेचे(Shivsena) स्वप्न आहे. तशा स्वरूपाचा ठरावही महानगरपालिका सभागृहाने मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यावर राज्य राज्यसरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. भाडेकरार संपून 10 वर्षे झाल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

इतकीच जमीन पालिकेच्या मालकीची

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा रेसकोर्सच्या भूखंडावर थीम पार्क(Theme Park) उभारण्याच्या हालचाली महानगरपालिका प्रशासनामार्फत सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेने आतापर्यंत राज्य सरकारला अनेक स्मरणपत्रे पाठवली असून हा संपूर्ण भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात दिल्यास एकत्रितपणे जागेचा विकास करून थीम पार्क उभारता येईल अशा स्वरूपाचे पत्र राज्य सरकारला पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडाचे क्षेत्रफळ 8.5 लाख चौरस मीटर इतके असून त्यापैकी केवळ 2.5 चौरस मीटर(Sq. Meter) क्षेत्रफळाची जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे. त्यामुळे संपूर्ण भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात येणार आहे.