देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती किती कमवत असतील हा अनेकांच्या कुतुहलाचा विषय असतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी या देशातील सर्वात श्रीमंत असल्याने त्यांना किती पगार मिळत असेल, त्यांचे एकूण उत्पन्न किती असेल हे सगळ जाणून घेणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
The salary of Mukesh Dhirubhai Ambani 15 कोटी रुपये वार्षिक इतकी आहे. यात विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी 1 रुपयाही पगार घेतला नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीकडून कोणताही पगार त्यांनी घेतला नाही. व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असलेल्या कोरोना महामारीमुळे त्यांनी स्वेच्छेने आपले पॅकेज सोडले आहे.
प्रथम गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी सॅलरी न घेण्याचा निर्णय घेतला होता. रिलायन्सने गतवर्षीच्या वार्षिक अहवालात याची माहिती दिली होती. यानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात अंबानींची सॅलरी शून्य इतकी होती. जून 2020 मध्येच मुकेश अंबानी यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात पगार न घेण्याची भूमिका जाहीर केली होती. कोरोना महामारीमुळे देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे, हे त्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आले होते. पण आता सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे 2021 -2022 मध्येही त्यांनी कोणताही पगार घेतलेला नाही. याचप्रमाणे या दोन वर्षात मुकेश अंबानी यांनी कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणताही लाभ घेतला नाही, असे सांगण्यात आलेले आहे.
मुकेश धीरूभाई अंबानी यांचे 15 कोटी रुपये इतके वार्षिक पॅकेज आहे. गेल्या 15 वर्षांपासून त्यांचा पगार याच पातळीवर आहे. मुकेश अंबानींचे चुलत भाऊ निखिल आणि हितल मेसवानी यांचे मानधन 24 कोटी रुपये इतके आहे . मात्र यामध्ये 17.28 कोटींच्या कमिशनचा समावेश आहे.
मुकेश अंबानींची Salary, Income, Net Worth
The salary of Mukesh Dhirubhai Ambani ही 15 कोटी इतकी असली तरी त्यांचे , मुकेश अंबानींचे Income, Net Worth हे त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. ते देशातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आहेत. आरआयएलची मार्केटमधील कामगिरी सातत्याने चांगली होत आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे गेल्याच वर्षी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस (Jeff Bezos) आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk)यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. जेफ बेझॉस आणि इलॉन मस्क हे 100 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या श्रेणीत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वेगाने वाढ होत ते देखील वर्षभरापूर्वीच 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणाऱ्या श्रीमंतांच्या गटात जाऊन बसले. गेल्या वर्षभरातही या शेअर्सच्या किमतीत चांगली वाढ होत असल्याने त्यांच्या भांडवली मूल्यात सातत्याने आणि वेगाने वाढ होताना दिसत आहे.
नीता अंबानींची सॅलरी (salary of Nita Ambani)
मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि कंपनीच्या संचालक मंडळातील गैर-कार्यकारी संचालक नीता अंबानी यांना प्रत्येक बैठकीसाठी 5 लाख रुपये आणि 2 कोटी रुपये इतके कमिशन मिळाले आहे. गेल्या वर्षी त्यांना प्रत्येक बैठकीसाठी 8 लाख रुपये आणि 1.65 कोटी रुपये कमिशन मिळाले होते. तर सर्व स्वतंत्र संचालकांना दोन कोटींचे कमिशन प्राप्त झाले.
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात त्यांनी आठ लाख रुपये सिटिंग फी घेतली आहे. तसेच कमिशन म्हणून 1.65 कोटी रुपयेही मिळाले.