Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव सातत्याने वाढत आहेत, जाणून घ्या याबाबत तज्ञांचे मत..

Wheat

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या (Uttar Pradesh and Bihar) अनेक भागांमध्ये गव्हाचे दर प्रति क्विंटल 3000 रुपये विकले जात आहेत. जाणून घेऊया गव्हाच्या दर वाढीबाबत काय म्हणतात तज्ञ..

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव (wheat price) सातत्याने वाढत आहेत. देशात महागाई (inflation) गगनाला भिडली आहे. भाजीपाला आणि फळांचे दर सातत्याने वाढत आहेत. खाद्यपदार्थांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वसामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. कमाईपेक्षा खर्च जास्त झाल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता गव्हाच्या वाढत्या भावाने गरिबीत पीठ ओले करण्याचे काम केले आहे.

पूर्व भारतात धान्याचा तुटवडा….. (Food shortage in East India)

देशात गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या (Uttar Pradesh and Bihar) अनेक भागांमध्ये गव्हाचे दर प्रति क्विंटल 3000 रुपये विकले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घरखर्च चालवणे कठीण झाले आहे. याचे कारण पूर्व भारतातील धान्याचा तुटवडा असल्याचे धान्य व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (Open Market Sale Scheme) अंतर्गत खुल्या बाजारात गव्हाची विक्री अजून सुरू केलेली नाही, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात वाढ होत आहे. पूर्व भारतातही गहू मिळत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत गहू वाटपावर बंदी घातली आहे. तेव्हापासून बाजारात त्याची मागणी वाढली आहे. 

सध्याचे गव्हाचे दर किती? (What is the current price of wheat?)

कृषी मंत्रालयाच्या (Ministry of Agriculture) अहवालानुसार, 8 जानेवारी रोजी गव्हाचा दर 2788 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. जे 2022 मधील गव्हाच्या किमतीपेक्षा 20 टक्के जास्त आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs)आकडेवारीनुसार, किरकोळ बाजारात गव्हाची किंमत सुमारे 31.17 रुपये प्रति किलो आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 15.76 टक्क्यांनी जास्त आहे. तर गव्हाचे पीठ 37.03  रुपये प्रतिकिलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 18.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.