Air Travel: 2022 मध्ये जागतिक स्तरावर विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जगावर मंदीचे सावट असतानादेखील विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशांतर्गत मागील वर्षीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या ही 4 कोटींनी वाढवून 12.32 कोटींवर पोहोचली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.
नागरी हवाई वाहतूक महासंचालक आकडेवारी
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation Statistics) या नियामक यंत्रणेने दिलेली आकडेवारी सांगते की, डिसेंबर 2022 मध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांनसोबत सुमारे 13.69 टक्के वाढीसह 1.27 कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून, जी मागील वर्षी याच कालावधीत 1.12 कोटी होती. डीजीसीएच्या आकडेवारीनुसार, विमान वाहतुकीतील स्थिती ही पूर्ववत झाली आहे. देशांतर्गत हवाई वाहतुकीने दररोज 4 लाखपेक्षा ही अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. मागील आठवडयातच विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 4 लाखापेक्षा ही अधिक झाली आहे.
‘इंडिगो’ आघाडीवर (Indigo at the forefront)
इंडिगो या हवाई सेवेने मागील वर्षा सर्वाधिक प्रवाशांची ने-आण केली आहे. मागील डिसेंबर महिन्यात इंडिगोसोबत 59.97 लाख प्रवाशांनी प्रवास केला असून त्यांचा 55.7 टक्के बाजारहिस्सा राहिला. तर एअर इंडिया (Air India) आणि विस्तारा (Vistara) यांनी अनुक्रमे 9.1 टक्के आणि 9.2 टक्के बाजार हिश्शासह 11.71 लाख आणि 11.70 लाख प्रवाशांना सेवा पुरवली. एअर एशियाच्या (Air Asia) माध्यमातून महिन्याभरात 9.71 लाख प्रवाशांची ने-आण करण्यात आली होती. त्यापाठोपाठ स्पाइसजेट (Spicejet) आणि गो फर्स्ट (Go First) विमान सेवांच्या माध्यमातून डिसेंबर 2022 मध्ये अनुक्रमे 9.64 लाख आणि 9.51 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. या कंपन्यांचे तिकीट दर कमी असल्याने प्रवाशांची संख्या जास्त दिसत आहे. नवीन विमान कंपनी असलेली आकासाने 2.3 टक्के हिस्सेदारीसह 2.92 लाख प्रवाशांना सेवा दिली असल्याचे सांगितले जात आहे.