PPF Scheme ही भारतातील लोकप्रिय झालेली पेन्शन स्कीम आहे. सुरक्षित परतावा हे तिचे वैशिष्ट्य असल्याचे आढळून येते. PPF Scheme मध्ये सध्या जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा 1 लाख 50 हजार रुपये वार्षिक इतकी आहे. मात्र या जास्तीच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारकडून नागरिकांना बचत करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये दीर्घ कालावधीचा म्हणजेच 15 वर्षे इतका लॉक इन कालावधी असतो. यामुळे दीर्घ मुदतीनंतर एक मोठा परतावा मिळवता येतो.
सुरक्षित परतावा याचप्रमाणे टॅक्स फ्री हे देखील PPF Scheme चे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. कर धोरणानुसार या योजनेतील मूळ रक्कम, मुदतपूर्तीनंतरची रक्कम, मिळणारे व्याज हे करातून मुक्त होते.
आयसीएआयने ने केली गुंतवणूकीची मर्यादा वाढवण्याची मागणी
PPF Scheme ही टॅक्स सवलतीच्या दृष्टीने महत्वाची असल्याने तसेच दीर्घ काळात त्यावर चक्रवाढ व्याजाने वाढत जाणारा परतावा मिळत असल्याने त्यात जास्तीत जास्त रक्कम गुंतवली जावी, असा विचार अनेक गुंतवणूकदार करत असतात. सध्या ही मर्यादा दीड लाख रुपये वार्षिक इतकी आहे. तसेच किमान मर्यादा ही वार्षिक 500 रुपये इतकी आहे. आत यात वाढ होण्याची मागणी करण्यात आली आहे.
आयसीएआयने गुंतवणूकीची ही मर्यादा वाढवण्याची मागणी केलेय. पूर्व अर्थसंकल्पात सरकारला सादर केलेल्या निवेदनात आयसीएआयने अशी मागणी केली आहे. सध्या दीड लाख रुपये असलेली ही मर्यादा वाढवून 3 लाख रुपये वार्षिक इतकी करण्याची ही मागणी आहे. यामुळे PPF Scheme मध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे झाल्यास PPF Scheme मधील गुंतवणूकदारांसाठी ही संधी
ही मागणी मान्य झाल्यास वार्षिक 1 लाख 50 हजारपेक्षा जास्त पैसे या स्कीमच्या ग्राहकांना यात गुंतवता येतील. यामुळे आपले अधिकचे दीड लाख रुपये सुरक्षित योजनेत गुंतवण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल. तसेच या योजनेतील गुंतवणूकदारांना अधिकच्या रकमेचा टॅक्समध्ये फायदा होऊ शकेल.