Nirmala Sitharaman Budget: ज्या नागरिकांना पर्यटनाची आवड आहे, अशा व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच पर्यटनसंबंधित काही योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये पर्यटकांसाठी ‘देखो अपना देश’ ही योजना आणली आली आहे. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेवुयात.
Table of contents [Show]
देखो अपना देश योजना (Dekho Apna Desh Yojana)
खास पर्यटकांसाठी देखो अपना देश ही योजना आणली आली आहे. या योजनेमध्ये पर्यटकांचा सर्व फिरण्याचा खर्च शासन उचलणार आहे. फक्त या योजनेअंतर्गत पर्यटकांनी आपले राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील पर्यटन स्थळाला भेट दयावी. जवळजवळ 15 पर्यटन स्थळांना भेट देणे आवश्यक आहे. या पर्यटन स्थळांचे फोटो मात्र सरकारला पाठविणे महत्वपूर्ण आहे.
पर्यटनाची संधी कशी मिळेल (How to Get Tourism Opportunity)
देखो अपना देश या योजनेंतर्गत पर्यटकांना वर्षभरात 15 पर्यटन स्थळांना भेट द्यावी लागणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या सोईनुसार कोणत्याही तारखेला व केव्हाही पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. यासाठी कोणतीही तारीख अशी ठरविली गेली नाही. मात्र तुम्हाला पर्यटन करण्याची ही ट्रीप एक वर्षाच्या आतच करावी लागणार आहे. तसेच तुम्ही भेट दिलेल्या पर्यटन स्थळांचे फोटो व खर्चाचा तपशील शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. तसेच तुम्ही भेट दिलेले पर्यटन स्थळे ही तुमच्या राज्यातील नसली पाहिजे, ती बाहेर राज्यातील असावीत. तसेच तुम्ही पर्यटनासाठी गेल्यावर क्लिक केले जाणारे, तुमचे फोटो हे अतुल्य भारत थीमवर असणे आवश्यक आहे.
रजिस्ट्रेशन कसे करायचे (How to Register)
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या देखो अपना देश या योजनेसाठी तुम्हाला mygov.in या वेबसाइटला सर्वप्रथम भेट द्यावी लागणार आहे. या साइटवर क्लिक केल्यानंतर येथे असणारे शपथपत्र भरावे. यामध्ये नाव, पत्ता, ई-मेल आयडी यांसारखी तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करावी.
पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटकांना योग्य सोई-सुविधा देणे ही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये पर्यटनासंबंधी एक अॅप करणार सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली. या अॅपमध्ये पर्यटन स्थळासंबंधित सर्व माहिती सखोल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून पर्यटन करताना त्यांना कोणत्याही अडी-अडचणींचा सामना करू लागू नये. तसेच प्रत्यक्ष दळणवळण, व्हर्च्युयल कनेक्टिव्हिटी, पर्यटक मार्गदर्शिका, खाद्यपदार्थांसाठी उच्च निकष आणि पर्यटकांची सुरक्षा यावरदेखील भर देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे.