The Entertainment Industry is Upset about the Budget: मनोरंजन सृष्टीतून देशात सर्वाधिक टॅक्स दिला जातो, पण याच क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काहीच घोषणा केली गेली नाही, हे मोठे दुर्देव आहे. मागील वर्षीदेखील अर्थसंकल्पात काहीच घोषणा केली नव्हती. यंदा थोडी फार आशा होती, मात्र आता निराशा झाली असल्याचे चित्रपटसृष्टीतून सांगण्यात येत आहे.
मनोरंजन क्षेत्राकडे नेहमीच दुर्लक्ष (There is no Budget for the Entertainment Sector)
निर्माते अशोक पंडित यांनी अर्थसंकल्पसंबंधित बोलताना म्हणाले की, आजपर्यंत सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक शासनाने मनोरंजन सृष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. इतर उदयोगांकडे जेवढे लक्ष दिले जाते, तेवढे गांभार्याने मनोरंजन क्षेत्राकडे पाहिले जात नाही, हे आमचे दुर्देव आहे. जेणेकरून मनोरंजन सृष्टीच्या माध्यमातून सर्वाधिक टॅक्स भरला जातो. तरी या क्षेत्राचा कोणताही विचार करण्यात येत नाही.
मनोरंजन सृष्टीला अर्थसंकल्पात काय पाहिजे? (What The Entertainment Industry Needs in the Budget)
देशाच्या अर्थसंकल्पमध्ये ओटीटी सब्सस्क्रिप्शन, मनोरंजन कर, नवीन स्क्रिन्स आणि फिल्म टुरिझम, चित्रपटांच्या तिकीटांचे दर या गोष्टींबाबत चर्चा करून, निर्णय घेऊन अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात येऊ शकते. मात्र असा काहीही विचार दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हणजेच 2023 च्या अर्थसंकल्पात करण्यात आला नाही.