Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आर्थिक बचत आणि गुंतवणूक यात काय फरक आहे?

आर्थिक बचत आणि गुंतवणूक यात काय फरक आहे?

आपल्या आर्थिक प्रवासाला सुरवात करण्याआधी बचत आणि गुंतवणूक यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.

आपल्या एकूणच कुटुंब व्यवस्थेत सगळ्यांना लहानपणापासून पैशांची बचत करायची असते असे शिकवले जाते. हळू हळू बचत करून एक दिवस खूप पैसे जमा होतील असे सांगितले जायचे. अशा सांगण्याने बऱ्याचदा बचत म्हणजेच गुंतवणूक असे समजले जाते. कधीकधी हे शब्द आपण एकमेकांऐवजी वापरतो. बचत आणि गुंतवणूक यामध्ये नेमका काय फरक आहे. बऱ्याचशा गुंतवणूकदारांना बचत आणि गुंतवणूक यातला फरक समजत नाही. या दोघांचीही उद्दिष्टेही वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी या दोघांमधला मूलभूत फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.


बचत म्हणजे काय? What is Savings?

आपण जे काही पैसे कमावतो, त्या पैकी काही भाग खर्च न करता बाजूला काढून ठेवणे, शिल्लक ठेवणे  म्हणजेच बचत. आत्ताच्या घडीला आपल्या वापरात नसलेली ठराविक रक्कम ही आपत्कालीन स्थितीसाठी किंवा भविष्यातील खर्चासाठी बाजूला काढून ठेवणे म्हणजेच बचत होय. हा असा पैसा आहे, जो तुम्हाला ठराविक वेळी अगदी सहजगत्या उपलब्ध झाला पाहिजे. त्यात कोणतीही जोखीम असू नये आणि त्याच्यावर कमीत कमी कर लागू असावा. आर्थिक संस्था आपल्याला बचतीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देतात. त्याच्यामध्ये निरनिराळ्या सरकारी बचत योजना आणि इतर पर्यायांचा समावेश आहे. आर्थिक मंदीचा काळ पाहिलेले अनेक गुंतवणूकदार सुद्धा आपत्कालीन स्थिती साठी म्हणून काही प्रमाणामध्ये पैसे बाजूला काढून ठेवण्याचा सल्ला देतात.

गुंतवणूक म्हणजे काय? What is an Investment?

गुंतवणूक म्हणजे पैसे किंवा संपत्ती वापरून अशा मालमत्ता (Assets) विकत घेणे, ज्यामध्ये सुरक्षित आणि ठराविक दराने परताव्याची संभावना सर्वाधिक आहे. जेणेकरून आर्थिक मंदी किंवा आर्थिक अडचणीच्या काळात सुद्धा आपल्याकडे पैशाचा एक अविरत प्रवाह सुरू राहील. यामध्ये समभाग, बॉण्ड आणि स्थावर मालमत्तेचा समावेश होतो.

बचतीचे फायदे/तोटे

  • अडचणीच्या वेळी तात्काळ मदत मिळते. 
  • बचत अधिक सुरक्षित असते. 
  • बचत अधिक सुरक्षित असल्याने आर्थिक नुकसान टळते. 
  • पैसे बँकेत बचत खात्यात ठेवल्यास त्यावर व्याज मिळते. 
  • बचतीसाठी पैसे घरात ठेवत असाल तर व्याज न मिळाल्याने पैसे वाढत नाहीत. 
  • घरात रोख रक्कम ठेवल्यास चोरीची भीती. 
  • हातात पैसे असल्याने अधिक खर्च होऊ शकतो. 
  • गुंतवणुकीच्या तुलनेत बँकेतील बचत खात्यावर व्याज कमी मिळते.  


गुंतवणुकीचे फायदे/तोटे 

  • मुद्दल तशीच राहते -वाढू शकते.
  • अधिक उत्पन्नाची निर्मिती होते. 
  • संपत्ती निर्माणास हातभार लागतो. 
  • चुकीची गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं.  
  • जिथे पैसे गुंतवले असतात ,तीच योजना बुडाल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते
  • एकाच योजनेत भरपूर किंवा सर्व पैसे गुंतवल्यास मोठा फटका बसू शकतो.
  • गुंतवणुकीचा काळ पूर्ण होई पर्यंत पैसे अडकून राहतात


बचत ही तात्काळ पैशाची सोय म्हणून नक्की हवी. गरजेपेक्षा जास्त किमतीची बचत करण्यापेक्षा थोडे पैसे गुंतवणे योग्य ठरेल. कारण गुंतवणुकीतून पैसे वाढतात. जर योग्य नियोजन केले तर बचतीतून गुंतवणूक आणि गुंतवणुकीतून बचत दोन्ही सहज शक्य आहे.