Famous Person On Twitter : एलन मस्क यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटर ताब्यात घेतल्यापासुन नेहमी चर्चेत राहणाऱ्या एलन मस्क यांच्या या कृतीने सोशल मिडीयावर बरीच चर्चा रंगली आहे. हे टेसला भारतात येण्याचे संकेत तर नाही ना? असा ही विचार अनेकांच्या मनात येत आहे.
Table of contents [Show]
एलन मस्क यांचे फॉलोअर्स किती
टेस्लाचे सीईओ म्हणून, मस्क यांचे 134.3 कोटी फॉलोअर्स ट्विटरवर आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अलिकडील अहवालानुसार, ट्विटरचे सुमारे 450 कोटी मासिक सक्रिय यूजर्स आहे. ज्यामुळे एलन मस्क देखील या सोशल फ्लॅटफार्मचा एक महत्वपूर्ण भाग आहे.
मोदींचे फॉलोअर्स किती
पंतप्रधान मोदी हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या राजकारण्यांपैकी एक आहेत, त्यांचे 87.7 कोटी फॉलोअर्स आहेत. तर आता मस्क यांनी चक्क मोदींनाच फॉलो केल्यामुळे मस्क यांचे भारतीय बाजारपेठेत टेस्ला आणण्याचे संकेत तर नाही ना? असा तर्क अनेक ट्विटर यूजर्सनी लावला आहे.
टेस्लाला आहे भारतातीय बाजारात इंटरेस्ट?
तर मे 2022 मध्ये मस्क भारतात टेस्लाचा कारखाना सुरु करण्याच्या विचारात होते. मात्र दरम्यान कारखाना निर्माण करणे, कार विकणे आणि सेवा देणे या तिन्ही गोष्टी जुळून आल्या नाहीत. मात्र, गेल्या काही काळापासुन टेस्ला भारतात उत्पादन सुविधा उघडण्यास इंटरेस्ट दाखवत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील कंपनीला फायदा होईल, असे उपाय सुचवले. मात्र, टेस्ला चीनकडून वाहने खरेदी करू शकत नाही, असे टेस्लाने स्पष्ट केले.
इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईल
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, लवकरच सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती भारतातील पेट्रोल वाहनांच्या किमतीपेक्षा कमी होतील. पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईपर्यंत वेळ लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर एलन मस्क यांनी भारतातील स्टार लिंक वापराच्या मान्यतेबाबत बोलतांना कंपनी सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहे, असे म्हटले होते.