TCS Salary Hike: टीसीएस (TCS) म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच आनंदाची बातमी आहे. या नामांकित कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 20 टक्के पगार वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या मुहुर्तावर या कर्मचाऱ्यांची घरी दिवाळी साजरी होत आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. जाणून घेऊया, याविषयी अधिक माहिती.
4 लाख कर्मचार्यांना 100% व्हेरिएबल पे
व्हेरिएबल (Variable Pay) म्हणजे कर्मचाऱ्यांना नियुक्तीवेळी ठराविक रक्कम दिली जाते. समजा 10 लाखाचा पॅकेज पगार ठरला असेल, तर 8 लाख निश्चित पगार म्हणून दिला जाते. तर उर्वरित रक्कम ही व्हेरीबल पेननुसार दिली जाते. कर्मचाऱ्यांचे काम किती समाधानकारक आहे त्यावर या रकमेतील काही रक्कम त्याला दिली जाते. काही कंपन्यांमध्ये व्हेरीएबल पे सीटीसीचा भाग नसतो. कंपनीनुसार या रकमेचे धोरण वेगवेगळे असते. सध्या TCS मध्ये 6 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 4 लाख कर्मचाऱ्यांना 2022 या आर्थिक वर्षासाठी व्हेरिएबल पे मिळणार आहे. तर उर्वरित 30 टक्के कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित भरपाई दिली जाणार आहे.
9,840 कर्मचाऱ्यांची वाढ
TCS HR संचालक मिलिंद लक्कड एका पोर्टलशी बोलतातना सांगतात की, “70 टक्के कर्मचार्यांसाठी, आम्ही 100 टक्के व्हेरिएबल वेतन देणार आहोत. उर्वरित 30 टक्के त्यांच्या व्यवसाय युनिटच्या कामगिरीवर आधारित दिले जाणार आहे. 2022 मधील जुलै-सप्टेंबर तिमाहीत प्रथमच टीसीएसने 10 हजार कोटींच्या नफ्याचा टप्पा ओलांडून, 10,431 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. चालू वर्षांतील पहिल्या तिमाहीत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील व टीसीएसच्या प्रतिस्पर्धी कंपन्या असलेल्या विप्रो आणि इन्फोसिसने चल वेतनात कपात केली आहे. चल वेतन साधारणत: कंपनीच्या कामगिरीवरून ठरत असते.
30 टक्के कर्मचाऱ्यांना कामगिरीवरून भरपाई
70 टक्के कर्मचाऱ्यांसाठी 100 टक्के व्हेरिएबल पे देणार आहेत. उर्वरित 30 टक्के रक्कम त्यांच्या व्यवसाय युनिटच्या कामगिरीच्या आधारावर दिली जाणार असल्याचे TCS HR संचालक मिलिंद लक्कड सांगतात. हे Q2 (जुलै-सप्टेंबर) साठी आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीची सध्याची कर्मचारी संख्या 6,16,171 आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विप्रो आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी कर्मचार्यांसाठी व्हेरिएबल पे भरपाई कमी केल्यानंतर TCS मध्ये वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.