तुम्ही जर तुमच्या मालकीच्या जुन्या घराचे नुतनीकरण करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांची काळजी करत असाल तर थांबा. तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. घराचे नुतनीकरण करण्यासाठी बँका ग्राहकांना विशेष कर्ज देत असतात. होम लोन म्हणजेच घर खरेदी करण्यासाठी घेतले जाणारे कर्ज आणि घराच्या नुतनीकरणासाठी घेण्यात येणारे कर्ज हे वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
Table of contents [Show]
का घेतले जाते असे कर्ज?
तुमचे घर जर जुने असेल, भिंतींना, सिलिंगला जर तडे गेले असतील तर दिसायला ते व्यवस्थित दिसत नाहीच परंतु घराचे बाजारमूल्य देखील कमी होते. घराची विक्री करण्यासाठी जर तुम्ही खरेदीदारांना आमंत्रित केले तर ते घराची अवस्था बघून कमी दरात तुम्हाला घराची मागणी करू शकतात. तुमचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर तुम्ही घराचे नुतनीकरण करायला हवे.
अशा प्रकारच्या कर्जाला नागरिकांची बरीच पसंती असते. बँका, वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था (NBFCs) तसेच गृहनिर्माण वित्त कंपन्या (HFCs) अशा प्रकारचे कर्ज देत असतात. वेगवगेळ्या बँका वेगवगेळ्या व्याजदराने कर्ज देत असतात.
किती मिळेल कर्ज?
जर तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर घराच्या नूतनीकरणासाठी 25 लाख रुपयांपर्यंत तुम्हांला कर्ज घेता येऊ शकेल. काही प्रकरणात तुम्ही घराच्या नूतनीकरणासाठी वैयक्तिक कर्ज (Personal Loan) देखील घेऊ शकतात. प्रत्येक बँकांचे कर्ज देण्यासंदर्भात नियम व अटी वेगवगेळ्या आहेत. घराची सद्यस्थिती, घराची मालकी, कर्जदाराची आर्थिक शिस्त आणि व्यवसाय, क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम, प्रोफाइल या आधारे ग्राहकाला कर्ज मिळते.
व्याजदर किती असेल?
गृहकर्जाच्या तुलनेत नूतनीकरणासाठी दिलेल्या कर्जाचे व्याजदर हे अधिक असतात. याचे मुख्य कारण म्हणजे गृहकर्जाच्या तुलनेत नुतनीकरण करणे हे जोखीमेचे असते. नव्याने बांधलेल्या घराच्या तुलनेत नुतनीकरण केलेले घर कमी कालावधी साठी सुस्थितीत राहणार असते. या सगळ्यांचा विचार करून फ्लोटिंग व्याजदरावर हे कर्ज दिले जाते. हे कर्ज वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत स्वस्त असते. सामान्यतः 8-12% पर्यंत या कर्जावर व्याज आकारले जाते.
कर सवलत!
प्राप्तीकर कायद्याच्या कलम 24 (b) नुसार वार्षिक 30,000 रुपयांपर्यंतच्या कर वजावटीसाठी ग्राहक दावा करू शकतात. ग्राहक ही वजावट स्वतःच्या मालकीच्या घरावर 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजाच्या भरणावर केली जाऊ शकते. खरे तर या प्रकारच्या कर्जात ग्राहकांना दुहेरी फायदा होत असतो. एक म्हणजे त्यांच्या जुन्या घराचे बाजारमूल्य वाढते, घराचे नुतनीकरण होते आणि कर सवलतीचा फायदा देखील मिळतो.