Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax On Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर किती टॅक्स लागतो, जाणून घ्या

Mutual Fund Investment, MF Investment, Share Market, Portfolio

Tax On Mutual Fund Investment : गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड योजना चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. गुंतवणुकीची सोपी प्रक्रिया हे यामागचे मुख्य कारण आहे. आपल्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करताना कर बचत हा एक महत्वाचा मुद्दा विचारात घेतला जातो. कोणती गुंतवणूक करमुक्त आहे आणि कोणत्या गुंतवणुकीवर कर लागू होतो हा मुद्दा गुंतवणुकीच्या प्रक्रियेत महत्वाचा ठरतो.

म्युच्युअल फंडांमधील करविषयक तरतुदींचा विचार करताना काही घटक विचारात घेणे आवश्यक आहेत. यातला पहिला घटक म्हणजे तुमचा म्युच्युअल फंड कोणत्या प्रकारचा आहे. इक्विटी आहे की डेब्ट? यातला लाभ (Gain on Investment) हा कॅपिटल गेन स्वरूपातील आहे की डिव्हीडंड स्वरूपातील? यातला आणखी एक घटक म्हणजे फंडचा कालावधी. हे तीन घटक यासंदर्भात विचारात घेतले जातात.

डिव्हिडंडवर लागू होणारा कर (Tax On Dividend) 

म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या लाभाचा हा एक प्रकार आहे. 31 मार्च 2020 पूर्वी म्युच्युअल फंडातून मिळणारे लाभांश गुंतवणूकदारांसाठी करमुक्त होता. मात्र यानंतर ते करपात्र झाले आहेत. एखाद्या आर्थिक वर्षात गुंतवणूकदाराला दिलेला कर लाभांश 5 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास तरतुदीप्रमाणे 10 टक्के टीडीएस कापला जातो. तुम्ही तुमचा कर भरता तेव्हा 10 टक्के टीडीएसचा दावा करू शकता.

कॅपिटल गेन आणि कालावधी यांचा परस्परसंबंध  (Capital Gain and Investment Term)

या प्रकारच्या लाभावरील करविषयक तरतुदींचा विचार करताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडस स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर कोणत्या कालावधीसाठी गुंतवणूक केली आहे, यावर अवलंबून असते. कालावधीचा विचार करताना दीर्घकालीन भांडवली नफा (Long Term Capital Gain) आणि अल्प-मुदतीचा भांडवली नफा (Short Term Capital Gain) समजून घेणे आवश्यक ठरते. LTCG हा एखाद्या फंडमधून दीर्घ कालावधीनंतर  झालेला भांडवली नफा आहे तर STCG हा तुलनेने कमी कालावधीसाठी घेतलेल्या तुमच्या फंडवरील भांडवली नफा असतो.

कर तरतुदींचा विचार करताना इक्विटी आणि डेब्ट या प्रकारानुसार दीर्घ आणि अल्प कालावधी वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ, म्युच्युअल फंडांमधील इक्विटी स्कीम्ससाठी दीर्घकालीन कालावधी हा 12 महिने तर डेब्ट स्कीम्ससाठी हा कालावधी 36 महिने इतका असतो. इक्विटीसाठी STCG 12 महिन्यापेक्षा कमी तर LTCG हा 12 महिन्यापेक्षा जास्त असतो. डेब्ट फंडसाठी STCG 36 महिन्यापेक्षा कमी तर LTCG हा 36 महिन्यांपेक्षा जास्त असतो. हायब्रिड स्कीम्ससाठी STCG 12 महिन्यांपेक्षा कमी तर LTCG हा 12 महिन्यांपेक्षा अधिक असतो. कालावधीनंतर तुमची म्युच्युअल फंडची स्कीम कोणती आहे हे बघितले जाईल. म्युच्युअल फंडाच्या इक्विटी, डेब्ट आणि हायब्रीड अशा प्रकारच्या स्कीम असतात.

इक्विटी म्युच्युअल फंडवरील कर आकारणी (Tax On Equity Mutual Fund)

कोणतीही  म्युच्युअल फंडाची योजना किमान 65% भारतीय इक्विटी किंवा इक्विटी-संबंधित गुंतवते ती कर तरतुदींचा विचार करताना इक्विटी-आधारित योजना म्हणून ओळखली जाते. इतर सर्व फंड योजना  कर आकारणीच्या दृष्टीने  डेब्ट योजना म्हणून ओळखल्या जातात.  इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांच्या विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफा कालावधीसाठी (LTCG) 10(38) नुसार पूर्वी  सूट होती. परंतु 2018 मध्ये यात बदल करण्यात आला. आता, इक्विटी म्युच्युअल फंड योजनांवर LTCG आयकर आकारला जातो. आयकर कायदा, 1961 च्या कलम 112A नुसार ₹1 लाखांपेक्षा जास्त भांडवली नफ्यावर 10% असा कर आहे.  इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांच्या युनिट्सच्या विक्रीवर प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 111A नुसार शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) साठी कर 15% आकारला जातो.

इक्विटी-लिंक बचत योजना (ELSS)

ELSS म्युच्युअल फंड अशा योजना आहेत ज्या त्यांच्या निव्वळ मालमत्तेपैकी किमान 80% इक्विटीमध्ये गुंतवतात. तुम्ही कर लाभासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा विचार करत असाल  तर ही याप्रकारची योजना म्हणून ओळखली जाते.  ELSS मध्ये गुंतवलेले पैसे प्राप्तिकर कायदा, 1961 च्या 80C अंतर्गत ₹1.5 लाख पर्यंत वजा करता येतात. यामध्ये एक लक्षात घ्यायला हव की, कलम 80C मध्ये ₹1.5 लाख ची मर्यादा आहे. तुम्ही आधीच LIC प्रीमियम सारख्या 80C अंतर्गत कव्हर केलेल्या इतर योजनेसाठी  दावा करत असल्यास, ELSS मधील तुमच्या गुंतवणुकीपैकी  कपात करण्यायोग्य रक्कम त्यानुसार कमी होईल. ELSS योजना तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी असतात.  एकदा तुम्ही ELSS मध्ये गुंतवणूक केली की, तुम्ही नेहमी LTCG टॅक्स भराल, STCG कर नाही. तुम्ही ELSS मध्ये गुंतवलेले पैसे तीन वर्षापूर्वी काढता येत नाहीत, तरीही तुम्हाला त्यावर कर्ज मिळू शकते.

डेब्ट म्युच्युअल फंड स्कीम  (Debt Mutual Fund)

आयकर कायदा, 1961 च्या कलम 112 नुसार, डेब्ट-केंद्रित योजनांवर LTCG कर 20% इंडेक्सेशन लाभांसह आकारला जातो. डेट म्युच्युअल फंडांवर STCG कर आकारणी कर स्लॅबनुसार आकारली जाते.

हायब्रीड स्कीमवर कर आकारणी (Tax on Hybrid Fund)

हायब्रीड फंडाचा म्युच्युअल फंड कर आकारणी हा इक्विटी-केंद्रित किंवा डेब्ट-केंद्रित हायब्रीड फंड आहे यावर अवलंबून असतो. 65% पेक्षा जास्त इक्विटी एक्सपोजर असलेला हायब्रिड फंड ही इक्विटी-केंद्रित योजना आहे आणि इतर सर्व हायब्रिड फंड डेब्ट-केंद्रित योजना म्हणून लक्षात घेतल्या जातात. इक्विटी किंवा डेट फंडांना लागू होणारे समान कर कायदे त्यांच्या इक्विटी एक्सपोजरवर अवलंबून हायब्रिड फंडांना देखील लागू होतात. हायब्रीड फंड इक्विटी-केंद्रित असल्यास LTCG ₹1 लाख (इंडेक्सेशनशिवाय) पेक्षा जास्त भांडवली नफ्यावर 10% आकारला जातो आणि STCG 15% आकारला जातो. हायब्रीड फंड डेब्ट-केंद्रित असल्यास: LTCG इंडेक्सेशन लाभांसह 20% आकारला जातो आणि STCG गुंतवणूकदाराच्या कर स्लॅबनुसार आकारला जातो.