• 07 Dec, 2022 08:24

Elon Musk on Twitter : ट्विटरकडून Blue Tick Account's ला मिळणार 'या' सुविधा

Verified Account Holders, Blue Tick Account, Twitter, Elon Musk

Image Source : https://www.cnbc.com

Facilities to Verified Account Holders: इलॉन मस्क यांनी सांगितल्याप्रमाणे ब्लू टिकच्या वापरकर्त्यांना रिप्लाय आणि सर्चमध्ये प्राधान्य मिळेल. जेणेकरून स्पॅम अकाउंटचा अटकाव करता येईल.

Facilities to Verified Account Holders:  इलॉन मस्क (Elon Musk) यांनी  ट्विटर्सच्या युजर्सना व्हेरिफाइड बॅज, किंवा ट्विटर ब्लू टिक असलेल्या अकाउंट होल्डर्सला दरमहा 8 डॉलर फी मोजावी लागणार आहे.  इलॉन मस्क यांनी असेही स्पष्ट केले आहे की, व्हेरिफाइड बॅज म्हणजेच ब्ल्यू टिकसाठीची मोजावी लागणारी किंमत ही वापरकर्ता ज्या देशाचा आहे तेथील क्रयशक्तीच्या समानतेवर किंवा ‘पीपीपी’वर (purchasing power parity) आधारित असेल. मुळात अमेरिकेत किंवा कोणत्याही विकसित देशात स्थायिक असलेल्या व्यक्तीला महिन्याला 8 डॉलर मोजावे लागतील. जर एखादा व्हेरफाईड युजर (Blue Tick Account holder) झिम्बाब्वे आणि भारतातील असेल तर त्याला महिन्याला अंदाजे 650 रुपये मोजावे लागतील. भारतासारख्या अविकसित किंवा विकसनशील देशात दरमहा 8 डॉलर म्हणजेच ही किंमत जास्त आहे त्यांच्यासाठी ब्लूटिकसाठीची किंमत कमी असेल.

ट्विटरच्या व्हेरिफाईड अकाउंट होल्डर्सला पैसे देण्यास भाग पाडले तर ते ट्विटर अकाउंट बंद करतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे सुरुवातीला 20 डॉलरचा आग्रह धरणाऱ्या इलॉन मस्क यांनी दरमहा 8 डॉलरचा प्लॅन जाहीर कमी केला. 

फेक अकाउंट ब्लॉक होणार (Fake Account will Block) 

इलॉन मस्क यांनी सांगितल्याप्रमाणे ब्लू टिकच्या वापरकर्त्यांना रिप्लाय आणि सर्चमध्ये प्राधान्य मिळेल. जेणेकरून स्पॅम अकाउंटचा अटकाव करता येईल. याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीचे व्हेरिफाईड अकाउंट (Blue Tick Account) आहे आणि ती व्यक्ती लोकप्रिय किंवा सेलिब्रेटी आहे, त्यांना प्राधान्यक्रम दिली जाईल जेणेकरून समान नाव आणि प्रोफाइल चित्र असलेले बनावट लोकांना (Fake Account will Block) अटकाव करता येईल.

ब्लू टिक अकाउंटला मिळणार या सुविधा (Facilities for Verified Account's) 

पैसे भरून ब्लू टिक मिळवणाऱ्या अकाउंट होल्डर्सना ट्विटरवर लॉंग व्हिडीओज आणि ऑडिओ पोस्ट करता येणार आहेत. तसेच ट्विटर ब्लू टिकशिवाय, पैसे न भरणाऱ्या युजरच्या तुलनेत त्यांना जवळपास निम्म्या जाहिरातीही दाखवल्या जाणार आहेत. शिवाय, ट्विटर काही प्रकाशन संस्थांशी भागीदारी करणार आहे जेणेकरून ट्विटर ब्लू टिक वापरकर्त्यांना पेवॉल मधील सामग्रीचा लाभ घेता येणार आहे.