टाटा मोटर्सने मागील काही महिन्यांपूर्वी टीयागो इव्ही (Tata Tiago EV) मॉडेल लाँच केले आहे. इव्ही मॉडेल बाजारात कधी येणार याबाबत मागली अनेक दिवसांपासून चर्चाही सुरू होती. सुरूवातीला कंपनीने फक्त पेट्रोल आणि सीएनजीवर आधारीत मॉडेल्स बाजारात आणली होती. नव्याने लाँच झालेल्या टाटा टियागो इव्हीची किंमत तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मॉडेलपेक्षा फारच कमी असल्याने या कारला पसंती मिळत आहे. नेक्सॉन इव्ही आणि अल्ट्रॉझ इव्ही या टाटाच्या गाड्यांची किंमत सुद्धा अशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे की, प्रतिस्पर्धी कंपनीला टक्कर देता येईल. पाहूया टाटा टियागो का घ्यावी. काय आहेत पाच कारणे ज्यामुळे टियागो ठरेल तुमची ड्रीम कार?
टाटा टियोगा सर्वात जास्त परवडणारी कार (Tata Tiago Most-affordable)
टाटा टियागो इव्ही हॅचबॅक गाडीची एक्स शोरुम किंमत 8 लाख 49 हजार रुपयांपासून सुरू होते. या गाडीचे टॉप मॉडेल्स 11 लाख 79 लाखांना आहे. टियागो इव्ही टाटाच्याच टिगॉर इव्ही कारपेक्षा 1 लाख 85 हजारांनी स्वस्त आहे. तसेच नेक्सॉनच्या टॉप इव्ही मॉडेलपेक्षा तब्बल साडेपाच लाखांनी स्वस्त आहे. त्यामुळे इव्ही सेगमेंटमध्ये टाटा टियागो ही सर्वोत्तम गाडी ठरते.
अपघात सुरक्षा मानांकनात चार स्टार (Safety: 4-star rated car)
टाटा मोटर्स कंपनीच्या सर्वच श्रेणीतील गाड्या सुरक्षिततेच्या मानांकनात पुढे आहेत. टाटा, पंच, नेक्सॉन आणि अल्ट्रॉज गाड्यांना अपघातापासून सुरक्षिततेचे पाच स्टार रेटिंग आहे. टाटा टियागो कारला सुरक्षेचे चार स्टार रेटिंग आहे. पुढच्या बाजूला एअर बॅग्जही आहेत. कार मागे घेत असताना रिव्हर्स कॅमेराही दिला आहे. I- TMPS आणि IP67 रेटेड बॅटरी पॅक आणि मोटारही दिली आहे.
टाटा टियागो - दोन बॅटरीचे पर्याय (Tata Tiago Two battery options)
टाटा टियागो कारला बॅटरीचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. 19.2kWh क्षमतेचा एक छोटा बॅटरी पॅक आणि दुसरा 24kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. 57 मिनिटींमध्ये दोन्ही बॅटरी पॅक 10 ते 80 टक्क्यांपर्यंत फॉस्ट चार्जिंगचा होऊ शकते. त्यामुळे कमी वेळात बॅटरी चार्ज होऊन तुमचा वेळ वाचेल. बॅटरी चार्ज करण्यासाठी 50kW चा फास्ट चार्जर सोबत येतो.
किती किलोमीटरपर्यंत बॅटरी टिकेल (Tata Tiago kilometer Range)
19.2 kWh च्या लहान बॅटरीने गाडी 250 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते तर 24 kWh बॅटरी पॅकने गाडी 315 किलोमीटर जाऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. इतर इव्ही गाड्यांच्या किंमती पाहता जर गाडी सुमारे 550 ते 600 किलोमीटरपर्यंत जात असेल तर टियागो हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
गाडीतील इतर फिचर्स (Top-notch features)
टाटा टियागो XZ+ Tech Lux गाडीमध्ये अत्याधुनिक फिचर्स देण्यात आली आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात जेव्हा हे मॉडेल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हा त्यास मोठी डिमांड असेल. टाटा टियागोच्या टॉप मॉडेलमध्ये अॅटोमॅटिक हेडलॅम्प, रेन सेंसिग वायपर्स, उच्च दर्जाचे इंटिरिअर अशी इतर काही फिचर्सही गाडीमध्ये आहेत जी आधीच्या मॉडेलमध्ये देण्यात आली नव्हती.