Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Steel annual production : टाटा स्टील इंडियाची भरारी, गाठलं आतापर्यंतचं सर्वोच्च वार्षिक उत्पादन

Tata Steel annual production : टाटा स्टील इंडियाची भरारी, गाठलं आतापर्यंतचं सर्वोच्च वार्षिक उत्पादन

Tata Steel annual production : टाटा स्टील इंडियानं पोलाद उद्योगात एक भरारी घेतली आहे. आतापर्यंतचं सर्वात जास्त कच्च्या स्टीलचं उत्पादन करून एक उद्दिष्ट साध्य केलंय. देशांतर्गत पोलाद क्षेत्रातल्या प्रमुख टाटा स्टील इंडियानं आपलं आतापर्यंतचं सर्वोच्च वार्षिक कच्च्या स्टीलचं उत्पादन सुमारे 19.9 दशलक्ष टन गाठलं आहे. दर वर्षात 4 टक्के अशी ही वाढ झाली आहे.

टाटा स्टील कंपनीची ही कामगिरी अशा काळात झालीय, ज्या आर्थिक वर्षात ऑपरेटिंगचं वातावरण (Operating environment) अस्थिर होतं. असं असतानाही डिलिव्हरी 3 टक्क्यांनी वाढली. कंपनीनं आर्थिक वर्ष 2022-23मध्ये नोंदवलेल्या मागच्या सर्वोत्तम कामगिरीलादेखील मागे टाकलं आहे. मजबूत विपणन जाळं (Marketing network) आणि उत्तम व्यवसाय मॉडेलच्या (Robust marketing) आधारे कंपनीचं देशांतर्गत वितरण दरवर्षी सुमारे 10 टक्क्यांनी वाढलं, असं कंपनीनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. भारत क्रूड स्टील उत्पादन, युरोप लिक्विड स्टील उत्पादन; टाटा स्टील थायलंड विक्रीयोग्य स्टील उत्पादन. तर टाटा स्टील इंडियाच्या आकडेवारीमध्ये टाटा स्टील स्टँडअलोन आणि टाटा स्टील लाँग उत्पादनं याचा यात समावेश आहे.

त्रैमासिक कालावधीत चढता आलेख

आर्थिक वर्ष 2022-23च्या चौथ्या तिमाहीत कच्च्या स्टीलचं (Crude steel) उत्पादन तिमाहीमध्ये (Quarter On Quarter) 3 टक्क्यांनी वाढून सुमारे 5.15 दशलक्ष टन झालं तर डिलिव्हरी 9 टक्क्यांनी वाढून 5.15 दशलक्ष टन झाली. आतापर्यंतचं कंपनीचं हे सर्वोच्च तिमाही वितरण आहे. विभागांचा विचार केल्यास, आर्थिक वर्ष 2022-23मध्ये ऑटोमोटिव्ह आणि विशेष उत्पादनं (2.7 दशलक्ष टन), ब्रँडेड उत्पादनं आणि किरकोळ (5.9 दशलक्ष टन) तर औद्योगिक उत्पादनं आणि प्रकल्प (7.2 दशलक्ष टन) असं विक्रमी देशांतर्गत वितरण झालं आहे.

मूल्यवर्धित उत्पादनांच्या विक्रीतही सातत्यपूर्ण वाढ

ब्रँडेड उत्पादनं आणि किरकोळ विभागातल्या वितरणांमध्ये टाटा टिस्कॉन, टाटा कोश, टाटा अॅस्ट्रम आणि टाटा स्टीलियम यांनी त्रैमासिक कालावधीत चांगली कामगिरी केली. औद्योगिक उत्पादनं आणि प्रकल्प विभागात विक्री तेल, वायू आणि रेल्वे यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये मूल्यवर्धित उत्पादनांच्या विक्रीतही सातत्यपूर्ण वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. वैयक्तिक घर बांधणार्‍यांसाठी एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म टाटा स्टील आशियानाचा महसूल या आर्थिक वर्षात सुमारे 18 टक्क्यांनी वाढून तो 1,730 कोटी रुपये झाला.

नीलाचल इस्पातची कामगिरी

अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर नीलाचल इस्पातनं त्वरीत काम सुरू केलं होतं. गेल्या दोन तिमाहींमध्ये इथली कामगिरीही सातत्यानं चांगली राहिली आहे. सध्या कच्चं स्टील आणि पिग आयर्नचा रन रेट वार्षिक आधारावर सुमारे 1 दशलक्ष टन आहे. टाटा टिस्कॉन रिबार्स (Neelachal Ispat Nigam Limited-NINL) बिलेट्सपासून बनवले जात आहेत.

युरोपातली डिलिव्हरी

आर्थिक वर्ष 2022-23मध्ये टाटा स्टीलची युरोपातील डिलिव्हरी सुमारे 8.1 दशलक्ष टन स्टीलची होती. आर्थिक वर्ष 2022-23च्या चौथ्या तिमाहीत मागणीत सुधारणा झाल्यामुळे वितरण 7 टक्क्यांनी तिमाहीत 2.13 दशलक्ष टन होतं. CM21 (कोल्ड रोलिंग मिल)मध्ये सुरू असलेल्या अपग्रेडेशनमुळे उत्पादनांच्या मिश्रणावर परिणाम झालाय. टाटा स्टीलचे शेअर्स गेल्या वर्षभरात जवळपास 22 टक्क्यांनी खाली आलेत. तर गेल्या सहा महिन्यांत ते जवळपास स्थिर राहिलेत. यादरम्यान गेल्या एका वर्षात सेन्सेक्स 1 टक्क्यांपेक्षाही कमी कोसळला तर गेल्या सहा महिन्यांत 2.5 टक्‍क्‍यांनी वधारला आहे.