Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Power: भारतात 25,000 EV Charging Points उभारणार!

Tata Power

(Auto Expo 2023) ऑटो एक्स्पोत आलेल्या नागरिकांना टाटा पॉवरचे व्यापक EV चार्जिंग नेटवर्क तसेच EV चार्जिंगसाठी सर्वाधिक डाउनलोड केलेल्या मोबाइल ऍप्सपैकी Tata Power EZ चार्ज यावर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देखील दिले गेले.

ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्सची (EV Charging Solution) एक महत्वाची कंपनी म्हणून टाटा पॉवर (Tata Power) ओळखली जाते. ई-मोबिलिटीची (E-Mobility)जलद सेवा देण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये देशभरात 25,000 इलेक्ट्रिक वाहने (EV) चार्जिंग पॉइंट्स स्थापित करण्याची देशव्यापी योजना सुरू केल्याची घोषणा टाटा पॉवरने शुक्रवारी केली.  

ग्रेटर नोएडा येथे चालू असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, कंपनी आपली हाय-टेक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सोल्यूशन्सची श्रेणी प्रदर्शित केली. कंपनीच्या निवेदनानुसार, ऑटो एक्स्पोत आलेल्या नागरिकांना टाटा पॉवरचे व्यापक EV चार्जिंग नेटवर्क तसेच EV चार्जिंगसाठी सर्वाधिक डाउनलोड केलेल्या मोबाइल ऍप्सपैकी Tata Power EZ चार्ज यावर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देखील दिले गेले.  


टाटा पॉवरच्या मते, हे ऍप प्रवाशांना जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यात, चार्जिंग पॉइंट्सची रिअल-टाइम (Real Time) उपलब्धता जाणून घेण्यास आणि इतर गोष्टींबरोबरच चार्जिंग स्टेटस अपडेट्स (Charging Status Update) प्राप्त करण्यास मदत करते. ईव्ही चार्जिंग स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणावर टाटा समूह सक्रिय असल्यामुळे 3,600 सार्वजनिक किंवा निम-सार्वजनिक चार्जर आणि 23,500 पेक्षा जास्त निवासी चार्जर्स नागरिकांसाठी उपलब्ध असल्याचा कंपनीचा दावा आहे. यापैकी अनेक चार्जिंग स्टेशन जलद चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि मॉल्स, हॉटेल्स, विमानतळे आणि ऑफिस कॉम्प्लेक्स यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी आहेत.