एखादी कंपनी खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या प्रयत्न करत आहेत. अशी गर्दी कधी पाहिलीय का? सध्या एक करार खूपच चर्चेत आहे. कपिटल फूड प्रायव्हेट लिमिटेड (Capital Foods Pvt. Ltd.) या कंपनीला खरेदी करण्यासाठीचा हा करार आहे. टाटा ग्रुप (Tata group) या कंपनीला खरेदी करण्यास इच्छुक आहे. मात्र ही एकच कंपनी नाही, तर भारतातल्या आणि भारताबाहेरच्या कंपन्याही यासाठी इच्छुक असल्याचं दिसतंय. टीव्ही 9नं याविषयीचं वृत्त दिलंय. नेस्लेचा करार अंतिम टप्प्यात आल्याच्याही बातम्या आहेत.
Table of contents [Show]
कोणाचा वाटा किती?
कॅपिटल फूड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खरेदी करण्यासाठी टाटा ग्रुपसह नेस्ले (Nestle) , हिंदुस्तान युनिलिव्हर (Hindustan Unilever), आयटीसी (ITC), क्राफ्ट हाइंज (Kraft Heinz), ओरक्ला (Orkla) आणि निसिन (Nissin) यांसारख्या कंपन्या इच्छुक आहेत. हा करार सुमारे 1 ते 1.25 अब्ज डॉलर्सचा असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅपिटल फूड्सच्या तीन मुख्य भागधारकांनी कंपनीची विक्री करण्याचं ठरवलं. गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांनी निर्णय घेतला होता. कॅपिटल ग्रुपची इनव्हस ग्रुपमध्ये 40 टक्के, यूएसस्थित प्रायव्हेट इक्विटी ग्रुप जनरल अटलांटिकमध्ये 35 टक्के आणि कॅपिटल फूड्सचे संस्थापक अध्यक्ष अजय गुप्ता (Ajay Gupta) यांची 25 टक्के भागीदारी आहे. कंपनी विकल्याची पहिली बातमी 14 नोव्हेंबरला समोर आली होती.
स्पर्धेत कोणत्या कंपन्या?
कॅपिटल फूड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विकत घेण्यासाठी, टाटा समुहासह नेस्ले SA, आयटीसी (ITC), हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, जपानी इन्स्टंट नूडल बहुराष्ट्रीय कंपनी निसिन फूड्स, नॉर्वेची ओरक्ला आणि जगातील पाचवी सर्वात मोठी फूड आणि बेव्हरेज कंपनी क्राफ्ट हाइंज यांच्यात स्पर्धा होणार आहे. नोव्हेंबरमध्ये या कंपनीच्या विक्रीची घोषणा झाली. आता गेल्या काही आठवड्यांपासून या प्रक्रियेला वेग आला आहे.
Nestle eyeing to seal a deal with Ching's secret to expand their product range in the fast growing ready to cook segment.
— Arvind Datta (@datta_arvind) March 30, 2023
Could be a game changer for Nestle if the deal goes through.https://t.co/0ncX2q9O7S
संभाव्य खरेदीदारांच्या व्यवस्थापनासोबत बैठका
एमटीआर आणि ईस्टर्न कंडिमेंट्सच्या पॅकेज्ड फूड या व्यवसायाची मालकी ओरक्लाकडे आहे. बहुतांश संभाव्य खरेदीदारांनी व्यवस्थापनासोबत आधीच बैठका घेतल्या आहेत. कंपनी कोण विकत घेणार, या खरेदीवर सट्टे लावले जात आहेत. नेस्ले, एचयूएल, आयटीसी आणि टाटा कंझ्युमर यांनी बाजारातल्या अशा सट्टेवर बोलण्यास नकार दिलाय. जीए (GA), गुप्ता (Gupta), निस्सीन (Nissin), क्राफ्ट हाइंझ (Kraft Heinz) आणि ओरक्ला (Orkla) यांच्याकडूनही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. व्यवहार नेमका कसा होणार, याचाही अंदाज बांधणं कठीण आहे. हा व्यवहार रोखीनं होणार की अर्धवट स्टॉकमध्ये हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जे संभाव्य खरेदीदार आहेत, ते कंपनीतला 75 टक्क्यांपर्यंत हिस्सा घेण्याची शक्यता आहे.
कॅपिटल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडविषयी...
अजय गुप्ता यांनी 1995मध्ये देसी चायनीज आणि इटालियन पोर्टफोलिओसह कॅपिटल फूड्स लाँच केलं. चिंग्स सीक्रेट स्मिथ अँड जोन्स ब्रँड अंतर्गत चायनीज फूड घरी बनवण्यासाठी मसाले तयार करते. या कंपनीअंतर्गत चिंग्स सीक्रेट इन्स्टंट चायनीज नूडल्स, सूप, मसाले, करी पेस्ट आणि फ्रोझन एन्ट्री, तसेच आले लसूण पेस्ट, सॉस आणि बेक्ड बीन्सची स्मिथ आणि जोन्स श्रेणी समाविष्ट होती. किशोर बियाणी यांनी या कंपनीला सहाय्य केलं होतं. किशोर बियाणी यांनी 13 कोटी रुपयांना कॅपिटल फूड्समधला 33 टक्के हिस्सा विकत घेतला होता. 2013मध्ये ते कंपनीतून बाहेर पडले. त्यांच्यानंतर 2018मध्ये जनरल अटलांटिकनं बोर्डात प्रवेश केला.
गुणवत्तेसंबंधीचा वाद
कॅपिटल फूड प्रायव्हेट लिमिटेडअंतर्गत तयार होणाऱ्या चिंग्स सिक्रेट नूडल्समध्ये घातक रसायनांचा वापर होत असल्याचं अन्न आणि औषध प्रसासनाला आढळून आलं. गुणवत्तेच्या चाचणीत त्यांचं प्रॉडक्ट अपयशी झालं. यासंबंधी न्यायालयातही धाव घेण्यात आली होती. नूडल्ससह मसाला, झटपट सूप, प्रीमियम सूप, सॉस आणि चटण्या, शेझवान चटणी, हक्का नूडल्स, स्नॅकी ओट्स आणि फ्रोझन एन्ट्रीज असे विविध पदार्थ तयार केले जातात. त्याचीही चाचणी यादरम्यान करण्यात आली होती.