आयपीएलनंतर लगेचच 15 दिवसांत महाराष्ट्रात महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा थरार गुरुवारपासून (दि. 15 जून) सुरू होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे Maharashtra Premier League-2023 स्पर्धा उद्यापासून पुण्यात सुरू होत आहेत. महाराष्ट्र प्रीमिअर लीगप्रमाणेच तमिळनाडू प्रीमिअर लीगच्या (TNPL) टुर्नामेंट मंगळवारपासून (दि. 12 जून) सुरू झाल्या आहेत. टीएनपीएलमध्ये विजेत्या ठरणाऱ्या टीमला 1 कोटी रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनतर्फे (Tamil Nadu Cricket Association-TNCA) तमिळनाडू प्रीमिअर लीग T20 या स्पर्धांचे आयोजन केले जाते. मागील 7 वर्षांपासून टीएनसीए स्पर्धेचे आयोजन करत आहे. 2023 मध्ये या स्पर्धा 12 जून पासून सुरू झाल्या आहेत; आणि याचा अंतिम सामना 12 जुलैला होणार आहे. या स्पर्धेचा फॉरमॅट आयपीएल प्रमाणेच असतो. म्हणजे दोन टीममध्ये 20 ओव्हरच्या मॅच खेळवल्या जातात. 2023 च्या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धा तमिळनाडूमधील सालेम, तिरूनेलवेली, दिंडगुल आणि कोईम्बतूर या 4 शहरांमध्ये खेळवल्या जाणार आहेत.
प्रत्येक टीममधील प्राथमिक फेऱ्या य 5 जुलैपर्यंत खेळल्या जाणार आहेत. त्यानंतर 7 जुलैला पहिली क्वॉलिफाय मॅच होईल. त्यानंतर 8 जुलैला एलिमिनेटर राऊंड होईल. त्यानंतर पुन्हा दुसरी क्वॉलिफाय मॅच 10 जुलैलो होईल आणि 12 जुलै रोजी फायनल मॅच होणार आहे.
TNPL Prize Money 2023
तमिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये विजेत्या ठरणाऱ्या संघाला मोठ्या रकमेचे म्हणजे 1 कोटी रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. त्याचबरोबर रनर-अप टीमला 60 लाख रुपये, 2 सेमी फायनलला आलेल्या टीमला 40 लाख रुपये आणि सहभागी होणाऱ्या संघांना 25 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.