Maharashtra Premier League 2023: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलची (Indian Premier league-IPL) धामधूम संपली; यामध्ये चेन्नई सुपर किंगने गुजरात टायटनला नमवत बाजी मारली होती. आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट प्रेमींसाठी महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 (Maharashtra Premier League-2023) आणली आहे. या लीगमधील विजेत्या टीम 50 लाख रुपयांचे तर रनर-अप टीमला 25 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
महाराष्ट्र प्रीमिअर लीगसाठी 6 संघ सज्ज झाले असून, हा थरार 15 जूनपासून पुण्यातील गाहुंजे स्टेडिअममधून क्रिकेट रसिकांना अनुभवता येणार आहे. या प्रीमिअरमध्ये क्रिकेटमधील टॉप प्लेअर्स सहभागी होणार आहेत. यात ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी, राजवर्धन हानगरगेकर, अजिम काझी आणि विकी ओसवाल अशा टॉपच्या क्रिकेटपटूंचा सहभागी असणार आहे.
महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 चा लिलाव 6 जून रोजी पार पडला. यामध्ये एकूण 285 खेळाडू सहभागी झाले होते. प्रत्येक टीमला यासाठी 20 लाखांची मर्यादा घालून देण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक टीमला किमान 15 खेळाडुंची खरेदी करणे गरजेचे होते. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 बद्दलची इत्यंभूत माहिती जाणून घेऊ.
Table of contents [Show]
- धनंजय मुंडेंची MPLच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये एंट्री
- महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) कधीपासून सुरू होणार आहे?
- महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये विजेत्या टीमला बक्षिस किती आहे?
- भारतात MPL चे सामने टीव्हीवर पाहता येणार का?
- MPL च्या सामन्यांचे मोबाईलवर प्रक्षेपण पाहता येणार का?
- महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या टीम आणि आयकॉन खेळाडू
धनंजय मुंडेंची MPLच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये एंट्री
आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे आयोजन केले आहे. यामध्ये सहा टीम सहभागी होणार असून. त्यातील मराठवाड्यातील छत्रपति संभाजी किंग्ज या संघाची मालकी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे बीडमधील आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कंपनीकडे आहे.
महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) कधीपासून सुरू होणार आहे?
महाराष्ट्र प्रीमिअर लीग (Maharashtra Premier League-MPL) 2023 ही स्पर्धा 15 जूनपासून सुरू होणार आहे. ही लीग पुण्यातील गाहुंजे स्टेडिअममध्ये रंगणार आहे.
महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये विजेत्या टीमला बक्षिस किती आहे?
महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये विजयी ठरणाऱ्या टीमला पहिल्या क्रमांकाचे बक्षिस म्हणून 50 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. तर रनर-अप टीमला 25 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
भारतात MPL चे सामने टीव्हीवर पाहता येणार का?
महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे सामने डीडी स्पोर्ट्स (DD Sports) या चॅनेलवरून पाहता येतील.
MPL च्या सामन्यांचे मोबाईलवर प्रक्षेपण पाहता येणार का?
सध्याच्या घडीला महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) मोबाईलवर पाहता येणार नाही.
महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या टीम आणि आयकॉन खेळाडू
- पुणेरी बाप्पा: ऋतुराज गायकवाड
- ईगल नाशिक टायटन्स: राहुला त्रिपाठी
- कोल्हापूर टस्कर्स: केदार जाधव
- छत्रपति संभाजी किंग्ज: राजवर्धन हांगरगेकर
- रत्नागिरी जेट्स: अजिम काझी
- सोलापूर रॉयल्स: विकी ओसवाल
नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेमध्ये एकूण 46.5 कोटी रुपयांच्या बक्षिसांची खैरात वाटण्यात आली. यामध्ये विजयी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग (CSK IPL Team) टीमला 20 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तर उपविजेत्या ठरलेल्या गुजरात टायटन टीमला 13 कोटी रुपये देण्यात आले. तिसऱ्या पदावर राहिलेल्या मुंबई इंडियन्स टीमला 7 कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावरील लखनऊ सुपर जायंट्स टीमला 6.5 कोटी रुपये देण्यात आले. या व्यतिरिक्त आयपीएलने ऑरेंज कॅपसाठी 15 लाख, पर्पल कॅपसाठ 15 लाख रुपये, इमर्जिंग प्लेअरसाठी 20 लाख रुपये, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरसाठी 12 लाख, गेम चेंजर ऑफ दी सिझनसाठी12 लाख आणि सुपर स्ट्रायकर ऑफ दी सीझनसाठी 12 लाख रुपये देण्यात आले.