Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SUVs Launches in December: कार घेण्याचा विचार आहे, डिसेंबरमध्ये या SUVs बाजारात दाखल होणार

SUV Launches in December

Image Source : www.bmw-m.com, www.mercedes-benz.co.in

SUVs Launches in December: दसरा आणि दिवाळीमध्ये कार्स आणि बाईकची जोरदार विक्री झाली होती. हा ट्रेंड लक्षात घेत ऑटो कंपन्यांनी डिसेंबरमध्ये नव्या मोटारींचे लॉचिंगचे प्लॅन्स जाहीर केले आहेत. चालू महिन्यात चार एसयूव्ही श्रेणीतील नव्या मोटारी बाजारात दाखल होणार आहेत.

वाहनांच्या बाजारात स्पोर्ट्स श्रेणीतील मोटारींची मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून एसयूव्ही मोटारींना पसंती दिली जात आहे. त्यामुळे ऑटो कंपन्या देखील या श्रेणीवर लक्ष केंद्रीत करत आहेत. डिसेंबर महिन्यात मर्सिडिज, बीएमडब्ल्यू या सारख्या लक्झरी कार उत्पादक कंपन्या नवीन मॉडेल्स लॉंच करणार आहेत. त्याशिवाय मारुती सुझुकीकडून एक आणि टोयोटाकडून 'एसयूव्ही'मधील मोटारीचे सीएनजी मॉडेल्स लॉंच केले जाणार आहे.

सात आसनी मर्सिडिज बेंझ GLB SUV

लक्झरी कार उत्पादनातील आघाडीची कंपनी मर्सिडिज बेंझकडून एसयूव्ही क्षेणीतील सात आसनी  मर्सिडिज बेंझ GLB ही कार लॉंच केली जाणार आहे. ही मोटार तीन प्रकारात सादर केली जाणार आहे. यात एंट्रा लेव्हल GLB-200, mid spec GLB-220d आणि उच्च श्रेणीतील GLB-200d 4Matic या तीन मोटारी लॉंच केल्या जातील. या कारमध्ये 10.25 इंचाचे इन्फोटेंमेंट, सन रुफ याचा समावेश आहे. पेट्रोलच्या गाडीमध्ये 1.3 लीटरचे टर्बो इंजिन असून त्याला 163 bhp पॉवर आहे. इतर मोटारींमध्ये 2.0 लीटरचे डिझेल इंजिन आहे.

याशिवाय  मर्सिडिज बेंझकडून EQB ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केली जाणार आहे. GLB सोबत या मोटारीची झलक दाखवली जाणार आहे.कंपनीकडून आंतरराष्ट्रीय बाजारात या श्रेणीचे इतर मॉडेल्स उपलब्ध आहेत. ज्यात  300 4Matic guise, 350 4Matic guise यांचा समावेश आहेत. भारतात मर्सिडिज बेंझने कमी वैशिष्ट्ये असलेली  300 4Matic guise ही मोटार सादर केलेली आहे.

बीएमडब्ल्यू एक्सएम (BMW XM)

बीएमडब्ल्यूकडून डिसेंबर महिन्यात XM या एक्सयूव्ही मोटारीला लॉंच केले जाणार आहे.हायब्रीड V-8 पॉवरट्रेन इंजिन या मोटारीमध्ये आहे. यात 8 स्पीडचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्समुळे चारही चाकांना एकाचवेळी ऊर्जा मिळते.

मारुती सुझुकी ग्रॅंड विटारा सीएनजी मॉडेल

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीकडून ग्रॅंड विटारा या एसयूव्ही मोटारीचे सीएनजी मॉडेल सादर केले जाणार आहे. मारुती सुझुकीची सीएनजी प्रकारातील ही पहिली एसयूव्ही असेल. या मोटारीमध्ये 1.5 लीटरचे K15C , 4 सिलिंडर इंजिन, 5 स्पीड गिअरबॉक्स यांचा समावेश आहे.

टोयोटा हायरायडर सीएनजी   

टोयोटा हायरायडरचे सीएनजी मॉडेल डिसेंबर महिन्यात लॉंच होणार आहे. नुकताच टोयोटाकडून  हायरायडर सादर करण्यात आली होती. हायरायडर सीएनजीचे दोन मॉडेल S आणि G लवकरच लॉंच केले जाणार आहेत. या मोटारीत  मारुती सुझुकी  1.5 लीटरचे K15C इंजिन  आहे.