अल्फाबेट (Alphabet) आणि गुगल(Google) चे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai), ज्यांना एकेकाळी भारत ते अमेरिका विमानप्रवासाचे तिकीट काढण्यासाठी जुगाड करावा लागला होता, ते आता 242 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच वार्षिक 1880 कोटी रुपये कमावतात. गुगलच्या कर्मचार्यांसह नुकत्याच झालेल्या टाऊन हॉल बैठकीत, पिचाई यांनी वरिष्ठ उपाध्यक्षांच्या स्तरावरील सर्व कर्मचार्यांच्या पगारात मोठी कपात केली जाईल अशी घोषणा केली. मात्र, पगारात किती कपात होणार? हे पिचाई यांनी सांगितले नाही. पण, पिचाई यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात कपात होणार हे निश्चित आहे. पण, कपात केल्यानंतरही पिचाई यांना मोठे पॅकेज मिळत राहणार आहे.
मासिक 163 कोटी पगार
सध्या पिचाई यांचे मासिक वेतन 163 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे अल्फाबेटचे शेअर्सही आहेत. सुंदर पिचाई यांची अंदाजे एकूण संपत्ती (Sundar Pichai NetWorth) 10,800 कोटी रुपये आहे. अल्फाबेटमधील कर्मचार्यांच्या कपातीच्या काही काळापूर्वी कंपनी बोर्डाने सुंदर पिचाई यांच्या पगारात मोठी वाढ केली होती. सीईओ म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्ट मानली गेली आणि 2019 मध्ये परफॉर्मन्स स्टॉक युनिट्स (पीएसयू) 43 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर असे म्हटले गेले. हे पेआउटसाठी आवश्यक परफॉर्मन्स वाढवते. IIFL Hurun India Rich List 2022 नुसार, सुंदर पिचाई सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापकांच्या यादीत समाविष्ट आहेत.
अशी करतात कमाई
सुंदर पिचाई यांना मूळ वेतन म्हणून 2 दशलक्ष डॉलर मिळतात. पिचाई यांच्याकडे अल्फाबेटचे एकूण 88,693 अल्फाबेट शेअर्स आहेत. हे कंपनीच्या एकूण शेअर्सच्या 0.01 टक्के आहे. त्यांचे सर्व शेअर्स, गुंतवणूक आणि पगार यांचा समावेश करून, 2023 मध्ये सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती 1,310 दशलक्ष डॉलर किंवा 1.31 अब्ज डॉलर आहे.
करोडोच्या गाड्यांचे मालक
सुंदर पिचाई यांच्याकडे जगातील आलिशान गाड्यांचा चांगला संग्रह आहे. यामध्ये पोर्श, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर आणि मर्सिडीज बेंझ यांचा समावेश आहे. सुंदर पिचाई यांचे सांता क्लारा काउंटी, लॉस अल्टोस हिल्स, कॅलिफोर्निया येथे एक लक्झरी अपार्टमेंट आहे. त्यांनी हे घर 40 मिलियन डॉलरला विकत घेतले. 4,000 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या घरामध्ये सर्व जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा आहेत. यात तीन बेडरूम, पाच बाथरूम, एक टेनिस कोर्ट आणि एक छोटा गोल्फ मैदान आहे. त्याच्याकडे वेस्टविंड वे आणि ला पालोमा रोडच्या नैऋत्येस 3.17 एकर जमिनीचा तुकडा देखील आहे.