Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Layoffs: नोकरकपात केल्यानं मोठा अनर्थ टळला, गुगलच्या कर्मचाऱ्यांना सुंदर पिचाई यांच उत्तर

Google Layoffs

Image Source : www.observer.com

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी गुगलने मागील आठवड्यात 12 हजार कर्मचारी कपातीची घोषणा करुन सर्वांना धक्का दिली. एकूण कर्मचाऱ्यांच्या 6% नोकर कपात करण्याचा मोठा निर्णय गुगलने घेतला. अल्फाबेट या गुगल समुहातील कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरी गमवावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात काही कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे.

Google Layoffs: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी गुगलने मागील आठवड्यात 12 हजार कर्मचारी कपातीची घोषणा करुन सर्वांना धक्का दिली. एकूण कर्मचाऱ्यांच्या 6% नोकर कपात करण्याचा मोठा निर्णय गुगलने घेतला. अल्फाबेट या गुगल समुहातील कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरी गमवावी लागणार आहे. अल्फाबेट कंपनीचे सीइओ भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे आहेत. दरम्यान, सुंदर पिचाई यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. "जर नोकर कपात केली नसती तर गुगलवर भविष्यात मोठं संकट ओढावलं असतं, त्यामुळे नोकरकपात अपरिहार्य होती, असं सुंदर पिचाई म्हटले.

सुंदर पिचाई यांनी केली नोकरकपात (Sundar Pichai tells Google employees)

ब्लुमबर्ग वृत्तपत्राने यासंबंधीची बातमी दिली आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की, सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या मिटिंगमध्ये ही माहिती दिली. सुंदर पिचाई यांनी कंपनीचे संस्थापक आणि संचालक मंडळाला 6% नोकरकपात करण्यासाठी विनंती केली होती. 'जर नोकरकपात केली नाही, तर गुगलवर भविष्यात मोठं संकट येईल. जर तुम्ही स्पष्टपणे आणि न डगमगता लवकर निर्णय घेतला नाही तर भविष्यातील कंपनीपुढील अडचणी आणखी वाढतील, त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आली आहे', असे सुंदर पिचाई म्हणाले.

पूर्वसूचना न देता कामावरून काढल्याचा दावा( Google employee layoff without intimation)

गुगलने 12 हजार कर्मचारी कपातीची घोषणा केल्यानंतर पहिल्या टप्प्यात काही कर्मचारी कमी केली. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून देण्यात येणारी सॉफ्टवेअर प्रणाली अॅक्सेस तत्काळ काढून घेण्यात आला. कामावरून काढून टाकल्याची माहिती त्यांना अॅक्सेस गेल्यानंतर कळाली असा दावा काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र, नोकरकपातीची निर्णय विचारपूर्वक आणि शांततेत राबवण्यात आल्याचा दावा गुगलने केला आहे.

नोकर कपात करताना काय म्हणाले होते सुंदर पिचाई?

आपण जे ध्येय ठरवलं आहे ते ताकदीचे आहे. भविष्यातील संधीबद्दलही मला खात्री आहे. आपण खूप लवकर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये गुंतवणूक सुरू केली असून आपली उत्पादने आणि सेवांचे मूल्यही जास्त आहे. जे कर्मचारी कामावरुन कमी केले जातील त्यांना भविष्यातील संधी शोधण्यासाठी मदत केली जाईल. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना नोटीस पिरियड पूर्ण होईपर्यंत पुढील 60 दिवस पूर्ण पगार देण्यात येईल, असे पिचाई यांनी संदेशात म्हटले आहे.

मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी 13% म्हणजेच 11 हजार कर्मचारी कपात केली. तर ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी साडेसात हजार कर्मचारी कपात केली. अॅमेझॉननेही 18 हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली आहे. तर मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला. शेअरचॅट, सेल्पफोर्स, झोमॅटो, स्वीगी या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली.