Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sula Vineyards IPO: सुला विनयार्ड्सचा आयपीओ आजपासून ओपन; सब्स्क्राईब करायचा का नाही, जाणून घ्या!

Sula Vineyards IPO Open Today

Sula Vineyards IPO: नाशिकमधील वाईन कंपनी सुला विनयार्ड लिमिटेड कंपनीचा IPO सोमवारपासून सबस्क्रिप्शनसाठी ओपन झाला. जाणून घ्या, आयपीओची प्राईस बॅण्ड, ग्रे मार्केट प्राईस आणि यात गुंतवणूक करावी की नाही याबाबत तज्ज्ञांचे मत!

Sula Vineyards IPO: भारतीय बाजारपेठेतील वाईन क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे; जिचा आयपीओ मार्केटमध्ये आहे आहे. 31 मार्चे, 2022 पर्यंत सुला विनयार्ड्स हा भारतातील सर्वांत मोठी वाईन उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीचा आयपीओ (IPO) सोमवारपासून (दि. 12 डिसेंबर) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन झाला आहे. 

सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) कंपनीने 100 टक्के द्राक्षापासून वाईन बनवण्याच्या प्रकारात 2009 मध्ये 33 टक्क्यांपर्यंत बाजारातील हिस्सा काबीज केला होता. तो आता 2022 मध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 52 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतातील वाईन उद्योगात ही अग्रेसर कंपनी मानली जाते.

सुला वाईनच्या आयपीओची वैशिष्ट्ये!

सुला विनयार्ड्स कंपनीने आयपीओच्या प्रत्येक इश्यूची किंमत 340-357 रुपये (Sula Vineyards IPO Price) निश्चित केली. कंपनी एकूण 2.69 कोटी शेअर्सची विक्री करून यातून 960 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी सोमवारपासून (दि.12 डिसेंबर) खुली झाली असून 14 डिसेंबरपर्यंत याचे सब्स्क्रिप्शन करता येणार आहे. तर 22 डिसेंबरला याच्या शेअर्सचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होईल.

सुला आयपीओमध्ये अँकर गुंतवणूकदारांनी 288.10 कोटी रुपयांची गुंतवणूक (Sula Vineyards Anchors) केली आहे.

मार्केटमधील तज्ज्ञांनी या आयपीओमध्ये सब्स्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही तज्ज्ञांनी नफा मिळवण्यासाठी किंवा जे जास्त जोखीम घेऊ शकतात. त्यांनी यात गुंतवणूक करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.

भारत हा वाईन उत्पादनासाठी आकर्षक आणि भविष्यातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे वाईनचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होताना दिसत आहे.

सुला विनयार्ड्स कंपनी ही वाईनची निर्मिती आणि विक्री करणारी भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. भारतीय वाईन बाजारपेठेचा विचार करता कंपनीला भविष्यात चांगली संधी आहे. त्यामुळे सुला आयपीओला चॉईस ब्रोकरेजच्या मार्केट रिसर्चने चांगेल रेटिंग दिले आहे.


ग्रे मार्केटमध्ये सुला विनयार्ड्सचा प्रीमियम (Sula Vineyards IPO GMP) किती आहे?

ग्रे मार्केटमधील स्थितीनुसार सुल विनयार्ड्सचा प्रत्येक इश्यूमागे 35 ते 40 रुपये प्रीमिअम देत आहे. सुला विनयार्ड्स ही कंपनी नाशिकमधील कंपनी असून, ती कंपनीचे सर्व शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale) म्हणून आणणार आहे. सुला विनयार्ड्सला बेल्जिअममधील वर्लिनवेस्ट (VerlinWest) कंपनीतून निधी पुरवठा होतो. वेर्लिनवेस्टने 10 वर्षांपूर्वी सुला विनयार्ड्समध्ये गुंतवणूक केली होती. 

राजीव सामंत हे सुला विनयार्ड्सचे एमडी आणि सीईओ (Rajeev Samant, MD & CEO, Sula Vineyards) आहेत. राजीव सामंत यांनी 1999 मध्ये नाशिकमध्ये पहिल्या वाईनरीची (सुला विनयार्ड्स) स्थापना केली. आज सुला ही भारतातील आघाडीची वाईन कंपनी असून ती जगभरातील वाईन ब्रॅण्डचे नेतृत्व करते.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महाMoney’ शेअर्स किंवा आयपीओ खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)