Story of Mukesh Kumar: भारतीय क्रिकेट संघातली(Indian Cricket Team) एक नवोदित नाव म्हणजे मुकेश कुमार. नुकतीच इंडियन प्रीमियर लीग 2023(IPL 2023) च्या सीझनसाठी शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये मिनी लिलाव पार पडला. या लिलावामध्ये केवळ 80 खेळाडू विकले गेले. यामध्ये प्रामुख्याने विदेशी खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला पण याच लिलावाने एका रिक्षाचालकाच्या मुलाला एका रात्रीत करोडपती बनवलं याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हो मी 'मुकेश कुमार' बद्दलच बोलतोय.
बिहारमधील गोपालगंजचा(Gopalganj) रहिवासी असलेल्या मुकेशचे वडील कोलकात्यात(Kolkatta) रिक्षा चालवायचे. गेल्याच वर्षी त्याच्या वडिलांचे दुख:द निधन झालं. असं म्हणतात संघर्षाचा काळ प्रदीर्घ असेल तर यश फार मोठं असत. मुकेशच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. खरं तर त्याला सैन्यात भरती व्हायचं होत. तसा त्याने तीनदा प्रयत्नही केला होता. मात्र, तीनही वेळा तो अपयशी ठरला. मुकेशला लहानपणापासूनच क्रिकेटची(Cricket) प्रचंड आवड होती. दरम्यान, मुकेशने कोलकात्यातील एका खासगी क्लबसाठी खेळायला सुरूवात केली. त्याला एक सामना खेळायचे केवळ 500 रुपये मिळत होते. 2014 मध्ये त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवड चाचण्यांमध्ये सहभाग भाग घेतला आणि 2015 मध्ये मुकेशने बंगाल संघातून पुढे आला.
आपल्या खेळाच्या जोरावर त्याने बिहारच्या अंडर-19 संघात एन्ट्री घेतली आणि आपल्याला हा नवोदित खेळाडू मिळाला. दिल्लीचा कोच रिकी पाँटिंगने(Coach Ricky Ponting) मुकेशच्या गोलंदाजपणाला हेरलं. मुकेश हा दिल्ली कॅपिटल्स संघातील(Delhi Capital Team) फलंदाजांसोबत नेटमध्ये गोलंदाजी(Bowling) करायचा. तो उजव्या हाताचा गोलंदाज(Right Hand Bowler) होता. त्याच्या खेळातील कौशल्याला पाहून टीम इंडियाच्या नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याची निवड केली खरी मात्र, तेथेही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या आतापर्यंतच्या झालेल्या मचेसमध्ये 33 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 123 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 6 वेळा एका डावात 4 आणि 6 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, त्याने 24 लिस्ट ए सामन्यात 26 विकेट घेतल्या होत्या. T20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर मुकेशने 23 सामन्यात 25 विकेट घेऊन स्वत: ची अशी एक वेगळी ओळख बनवली.
काल झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जास्त रक्कम यावेळी झालेल्या आयपीएल (IPL 2023) लिलावात दिली गेली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला यावेळी सर्वाधिक 18.50 कोटी रुपयांची बोली लागली त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन 18.50 कोटी, बेन स्टोक 15.50 कोटी, आणि निकोलस पूरन 16 कोटींमध्ये विकला गेला हे आपल्या सगळ्याच माहितीये. भारतीय खेळाडूंवरही चांगलीच बोली लागली. भारतीय खेळाडूंच्या याच बोलीत युवा अनकॅप खेळाडू मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. खरं तर मुकेशची बेस प्राईस किंमत 20 लाख रुपये होती. त्याला त्याच्या बेस प्राईसच्या 27 पट अधिक किंमत मिळाली आणि रातोरात तो करोडपती झाला. एका रिक्षावाल्याच्या मुलाने 500 रुपयापासून सुरु केलेला त्याचा हा डाव 5.50 कोटींपर्यंत पोहचला.