Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stocks vs Mutual Fund : स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडपैकी कशात गुंतवणूक करणे चांगले आहे?

Stocks vs Mutual Fund

बहुतेक गुंतवणूकदारांना या पेचप्रसंगाचा सामना करावा लागतो की स्टॉक निवडावा (Investment in Stocks) की म्युच्युअल फंड (Investment in Mutual Funds)? याचे असे कोणतेही चुकीचे किंवा बरोबर उत्तर नाही. ही बाब पूर्णपणे सब्जेक्टिव्ह आहे.

बहुतेक गुंतवणूकदारांना या पेचप्रसंगाचा सामना करावा लागतो की स्टॉक निवडावा (Investment in Stocks) की म्युच्युअल फंड (Investment in Mutual Funds)? याचे असे कोणतेही चुकीचे किंवा बरोबर उत्तर नाही. ही बाब पूर्णपणे सब्जेक्टिव्ह आहे आणि त्याची एकमेकांशी तुलना करणे म्हणजे सफरचंद आणि संत्री यांची तुलना करण्यासारखे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुम्ही स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमच्या निवडीसाठी जबाबदार आहात. दुसरीकडे, तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास, फंड मॅनेजर तुमच्या वतीने हा कॉल घेतो. तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्ही काही घटक लक्षात घेऊन स्टॉक किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी.

बाजार अनुभव

जर तुमच्याकडे आवश्यक ज्ञान आणि अनुभव असेल, तर थेट स्टॉक गुंतवणूक खूप फायदेशीर ठरू शकते. मात्र, तुम्ही अधूनमधून शेअर्समध्ये गुंतवणूक करत असल्यास किंवा सल्ल्यासाठी थर्ड पार्टीवर अवलंबून असल्यास, तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करावा. दुसरीकडे, म्युच्युअल फंडांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. फंड मॅनेजर तुमच्या पोर्टफोलिओची काळजी घेतो. म्हणजेच, आपल्याला पुन्हा पुन्हा बाजाराचा मागोवा घेण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात, म्युच्युअल फंड निष्क्रिय गुंतवणूकदारांसाठी चांगले काम करतात ज्यांना वेळ आणि अनुभव कमी आहे.

पोर्टफोलिओ डायव्हर्जन

गुंतवणुकीच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक म्हणजे पोर्टफोलिओ डायव्हर्जन. हे जोखीम कमी करण्यास आणि पोर्टफोलिओ बॅलेन्स करण्यास मदत करते. तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातील 10-15 शेअर्सच्या बास्केटमधून पोर्टफोलिओ डायव्हर्जन मिळते. जेव्हा तुम्ही कोणत्या एका स्टॉकमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला कंपनी ज्या डोमेनमध्ये काम करते त्या डोमेनशी एक्सपोजर मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या तंत्रज्ञान कंपनीचे शेअर्स विकत घेतल्यास, तुमचे एक्सपोजर फक्त त्या क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुमचे पैसे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आणि स्टॉकमध्ये गुंतवले जातात. यासह, तुमचा पोर्टफोलिओ आपोआप वैविध्यपूर्ण होतो.

असा मिळतो परतावा

स्टॉकमधून परतावा मिळवताना तुम्हाला कधी आनंद तर कधी दुःखाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. तुमच्याकडे मल्टीबॅगर असल्यास, तुमचा परतावा काही वेळाने वाढू शकतो. हे तुमचे रिटर्न एका रात्रीत दुप्पट करू शकते. दुसरीकडे, तुम्ही चुकीचा स्टॉक निवडल्यास, ते तुमची गुंतवणूक बुडवू शकते. तुमचा पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडामध्ये नेहमीच वैविध्यपूर्ण असतो, त्यामुळे त्यामध्ये जास्त परतावा पण नाही किंवा खूप कमी परतावा पण मिळत नाही.