Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Open: शेअर बाजारात, आठवड्याची सकारात्मक सुरुवात, या कंपन्यांचे शेअर्स वधारले!

Share Market Open

Stock Market Opening Bell Today: आज, दिनांक 9 जानेवारी रोजी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काय घडले? कोणते स्टॉक वधारले, कोणत्या स्टॉकने उतरता क्रम घेतला ते या बातमीतून जाणून घ्या.

Trade setup for today:: भारतीय शेअर बाजारा त नवे वर्ष सुरू झाल्यानंतर, आठवड्यातील बहुतांश दिवशी बाजारात घसरण सुरू होती. या आठवड्याची सुरुवात, मात्र सकारात्मक झाली आहे. बीएसई (BSE) सेन्सेक्सने जोरदार उसळी घेत 60 हजारांच्या वर पोहोचला आहे. 

देशांतर्गत बाजाराची सुरुवात हिरव्या रंगाने झाली आहे. आज, दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर बीएसई (BSE) सेन्सेक्सने 589 अंकांच्या वाढीसह 60 हजार 480 वर व्यवहार करण्यास सुरुवात केली, तर निफ्टी 170 अंकांनी वाढून 18 हजार 29 वर पोहोचले. 

आज निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. मात्र, कन्ज्युमर ओरिएंटेड कंपन्याची स्थिती बिघडली आहे. महत्त्वाची गोष्टी म्हणजे आयटी इंडेक्समध्ये 2 टक्के वाढ दिसून येत आहे. टिसीएसमध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

कोणत्या शेअर्सचे दर वधारले आणि कोणते खालावले? (Which stocks rose and which fell?) 

आज व्यवसाय सुरू होताच, गुंतवणुकदारांनी हिंदाल्को इंडस्ट्रीज (Hindalco Industries), ओएनजीसी (ONGC), जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि इंडसइंड बँक (IndusInd Bank) यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वेगाने खरेदी करण्यास सुरुवात केली आणि सततच्या गुंतवणुकीमुळे या कंपन्यांचे शेअर्स टॉप गेनर्सच्या यादीत अव्वल ठरले आहेत. 

टायटन (Titan), एशियन पेंट्स (Asian Paints), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि आयशर मोटर्स (Eicher Motors) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. 

आशियातील शेअर बाजारही चढत्या क्रमाने (Asian stock markets rose today) 

आशियातील बहुतांश शेअर बाजार आज चढत्या क्रमाने जात आहेत. सिंगापूर स्टॉक एक्स्चेंज 0.75 टक्क्यांनी वधारत आहे, तर जपानचा निक्केई 0.59 टक्क्यांनी वधारत आहे. त्याचप्रमाणे हाँगकाँगच्या बाजारात 1.25 टक्के आणि तैवानमध्ये 1.61 टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. दक्षिण कोरियाचा कॉस्पी 2.02 टक्क्यांनी तर चीनचा शांघाय कंपोझिट 0.35 टक्क्यांनी वधारत आहे.