Crash course stock trading: शेअर खरेदी करण्यासाठी पहिले स्टॉक ब्रोकर निवडणे आणि त्याच्याकडे तुमचे डिमॅट खाते सुरू करणे गरजेचे आहे. हे खाते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे काढता येते. खाते उघडल्यानंतर, ब्रोकर तुम्हाला ट्रेडिंग अॅपमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रदान करतो. ही ट्रेडींगची पूर्वतयारी झाली. इथून पुढे खऱ्या ट्रेडिंगला सुरुवात होते. ही नेमकी प्रक्रिया आपण पुढे पाहुयात.
ट्रेडींग करण्यासाठी सर्वप्रथम, योग्य स्टॉक निवडणे आणि व्यापार करणे किंवा त्यात गुंतवणूक करणे. यासाठी तुम्हाला किती काळ स्टॉक खरेदी करायचा आहे आणि तुमचे लक्ष्य काय आहे हे ठरवावे लागेल. जसे की जर तुम्हाला चांगल्या परताव्याची अपेक्षा असेल तर त्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक योजनेनुसार स्टॉकची निवड करावी लागेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, त्या कंपनी आणि व्यवसायाची माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी त्या कंपनीची बॅलन्सशीट अर्थात त्यांचा नफा, तोटा, प्रोडक्ट किंवा सेवंची माहिती, मर्जर्सची माहिती आदी बाबी माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला फक्त बाजार आणि स्टॉकच्या अस्थिरतेतून फायदा मिळवायचा असेल, तर त्याला इंट्राडे ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात.
ऑनलाईन शेअर कसे खरेदी करावेत? (How to buy shares online?)-
डिमॅट खाते उघडल्यावर, स्टॉक ब्रोकर तुम्हाला ट्रेडिंग अॅप देतो, आता या ट्रेडिंग अॅपचा वापर करून तुम्ही ऑनलाइन स्टॉकची खरेदी - विक्री करू शकता. तुमच्या होल्डिंग कालावधीनुसार स्टॉक निवडल्यानंतर, तुम्ही तो तुमच्या ट्रेडिंग अॅपमध्ये प्रदान केलेल्या वॉचलिस्टमध्ये जोडू शकता.
आता या वॉचलिस्टच्या मदतीने तुम्ही रिअल-टाइममध्ये स्टॉकमधील चढ-उतार पाहू शकता आणि त्याचे अनॅसिसीस करून योग्यवेळी त्याची खरेदी करू शकता.
ट्रेडिंग अॅपवरून स्टॉक खरेदी करण्यासाठी, तेथे उपलब्ध पर्यायांमध्ये BUY बटणावर क्लिक करा. तुमच्या समोर एक खरेदी विंडो उघडेल, स्टॉकची मात्रा, किंमत इत्यादी सर्व माहिती भरा. जर तुम्हाला डिलिव्हरी ट्रेडिंग करायची असेल तर सामान्य NORMAL किंवा CNC पर्याय निवडा.
इंट्राडे ट्रेडिंगसाठी MIS किंवा Intraday पर्याय निवड. तुम्हाला मर्यादा ऑर्डर करायची असल्यास, त्यासाठी ऑर्डरची वैधता (Day आणि IOC) निवडा. ही सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. तुमच्या ऑर्डरचे सर्व तपशील एक्सचेंजला पाठवले जातील जेथे किंमत जुळल्यास तुमची ऑर्डर एक्झिक्यूट केली जाईल. शेअर विकण्यासाठी तुम्ही अॅपवरी Sell बटणावर क्लिक करून तेथे शेअरची माहिती, संख्या भरून विकण्याची ऑर्डर प्लेस करू शकता. ऑर्डर सबमीट झाल्यावर, मग एक्सचेंजद्वारे ऑर्डर एक्झिक्युट केली जाते.
ब्रोकरशिवाय शेअर खरेदी करता येते? (Can share be bought without a broker?)
स्टॉक मार्केटमध्ये, तुम्ही कोणत्याही कंपनीचे लिस्टेड शेअर्स खरेदी करू शकता ज्यासाठी तुम्हाला स्टॉक ब्रोकरची गरज भासते, परंतु तुम्हाला अनलिस्टेड शेअर्स खरेदी करायचे असल्यास, तुम्ही स्टॉक ब्रोकरशिवाय ते खरेदी करू शकता. यासाठी तुम्ही डायरेक्ट स्टॉक पर्चेस प्लॅन (DSPP) वापरू शकता. यामध्ये गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने, किरकोळ गुंतवणूकदार स्वतःची रक्कम गुंतवतो आणि शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपनीचा अनलिस्टेड स्टॉक खरेदी करतो. हे शेअर्स शेअर बाजारातील किमतीपेक्षा वेगळे आहेत आणि बहुतेक ते कमी किमतीत उपलब्ध करून दिले जातात.
अशा प्रकारे स्टॉक खरेदी करण्यासाठी, गुंतवणूकदाराने कंपनीशी थेट संपर्क साधावा आणि त्यांनी प्रदान केलेल्या नियमांचे पालन करून शेअर्स खरेदी करावे. यासाठी कोणतीही नियामक संस्था नसल्यामुळे असे शेअर्स खरेदी करण्यात जास्त धोका असतो.