RBI Currency Rule: अनेकदा एखादी नोट ज्यावर काहीतरी लिहिलेलं किंवा रंग लागलेला असतो अशावेळी दुकानदार ती नोट घेण्यास नकार देतो पण तुम्हाला जुन्या फाटलेल्या नोटा किंवा नोटांवर लागलेले डाग आणि रंग यासंदर्भातील रिझर्व्ह बँकेचा (RBI) नियम काय सांगतो माहितीये का? जर माहिती नसेल तर आजच्या या लेखातून जाणून घ्या.
देशात चलन जारी करण्याची किंवा नोटा छापण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे. रिझर्व्ह बँकेला कायद्याच्या कलम 22 नुसार भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार आहे.
रिझर्व्ह बँकेचा नियम काय सांगतो?
- रिझर्व्ह बँकेच्या(RBI) म्हणण्यानुसार महात्मा गांधींच्या प्रतिमा(Mahatma Gandhi) असलेल्या सर्व नोटा, ज्यावर काहीतरी लिहिलंय किंवा रंग लागलेला आहे, त्या वैधरित्या चलनात वापरता येतात. परंतु त्या नोटांवर असलेले अंक वाचता येणे गरजेचे आहे. अशा नोटा कोणत्याही बँकेच्या कुठल्याही शाखेत जमा केल्या जाऊ शकतात किंवा बदलून घेता येऊ शकतात
- नोटेवर राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाचा संदेश देण्याच्या उद्देशाने लिहिलेले कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या हितसंबंधांची पूर्तता करण्यासाठी मदत झाल्यास, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (नोट रिफंड) नियम, 2009 नुसार नोटांच्या संदर्भात असा दावा रद्द करू शकते
- रिझर्व्ह बँक वेळोवेळी फाटलेल्या नोटांसंदर्भात सर्कुलर(Circular) जारी करत असते अशा प्रकारच्या नोटा तुम्ही बँकेच्या कोणत्याही ब्रांचमध्ये(Branch) किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात(RBI Office) जाऊन बदलून घेऊ शकता
- मात्र या नोटा बदलण्यासाठीची एक मर्यादा आहे. RBI च्या नियमांनुसार, एक व्यक्ती एका वेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलून घेऊ शकते
- त्याशिवाय नोटांची एकूण किंमत 5000 रुपयांपेक्षा जास्त असू नये
- अतिशय वाईट प्रकारे जळलेल्या, तुकडे झालेल्या नोटा ग्राहकांना बदलून देता येणार नाहीत
- अशा अतिशय खराब असणाऱ्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात