Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Solapur DCC Bank: आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोलापूर जिल्हा बँकेची विशेष योजना

Solapur DCC Bank

Image Source : www.solapurdccb.com

Solapur DCC Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्राथमिक तत्त्वावर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, माढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये या योजनेला यश मिळाल्यानंतर ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी राबविण्यात आली.

Solapur DCC Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सक्षम करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत बचत गटांना सूक्ष्म कर्जवाटप योजना(Loan Scheme) प्रभावी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. दारिद्र्यरेषेखालील येत असलेले गोरगरीब व्यक्ती, महिला(Women), शेतमजूर(Farm Worker), सूक्ष्म व छोटे उद्योजक, ग्रामीण कारागीर यासारख्या समाजघटकांना या योजनेचा फायदा होताना पाहायला मिळत आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

अशा प्रकारे राबवली योजना

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींचे उत्पन्न अल्प असते. त्यांच्याकडे पुरेसे तारणही नसल्याने ते बँकिंग सेवा सुविधांपासून वंचित राहत असतात. ही बाब रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्या पार्श्‍वभूमीवर ‘ना कारण ना तारण’ या तत्त्वावर नागरिकांचे शून्य बाकीवर बँकांमध्ये सेव्हिंग खाते उघडण्यात आले. या लोकांना एका बाजूला काटकसर करून बचतीची सवय लावणे व दुसऱ्या बाजूला त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी भांडवल म्हणून समूह ग्रुप(JLIG Group) योजना जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे(Shailesh Kotmire) यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, माढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये यश मिळाल्यानंतर बँकेने ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी राबविण्यात आली. याबाबतची माहिती जेएलजीचे क्षेत्रीय निरीक्षक विलास घाडगे(Vilas Ghadge) यांनी दिली आहे.

3,000 बचत गटांना आर्थिक मदत

3,000 बचत गटांना जिल्हा बँकेकडून जून 2018 ते सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये 3,282 बचत गट व 13,271 सभासदांना 40 कोटी 71 लाख 65 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये भाजी विक्रेते, शिलाई काम, बांगड्याचा व्यवसाय, डबे बनविणाऱ्या महिला, पोळपाट बनविणे, ब्युटी पार्लर, वडापाव अशा वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या 70 प्रकारच्या व्यावसायिक महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या गटातील सदस्यांना कमी हप्त्यामध्ये कर्जविमा व अपघात विमा देण्यात आला असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दूध व्यावसायिकांना आर्थिक मदत

या योजनेमध्ये बँकेने खासगी दूध डेअरी संस्थांना कर्जवाटप केले. यामध्ये चार किंवा सहा सदस्यांचा गट करण्यात आला होता. सदरच्या डेअरीला 50 हजार प्रति सभासद प्रमाणे एका गटात तीन लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. जेएलजी व लाइव्ह स्टॉक या योजनेमार्फत प्रत्येक सभासदाला 75 हजार प्रमाणे एका गटात चार लाख 50 हजाराचे वाटप केले. त्याचा फायदाही दूध व्यवसायिकांना झाला आहे.