युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसांच्या एफडीवर 9 टक्के व्याज देत आहे, तर सामान्य लोकांना या काळातील एफडीवर 8.50 टक्के व्याज मिळत आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या 'शगुन' या विशेष एफडी योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर युनिटी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. युनिटी बँकेच्या नव्या दरांनुसार ज्येष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणुकीवर 9 टक्के व्याज मिळेल, तर सर्वसाधारण गुंतवणुकीला 8.50 टक्के व्याज मिळेल. नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा बँकेने एफडी व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, कॉलेबल आणि नॉन-कॉलेबल बल्क डिपॉझिट्स म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त एफडीच्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. वाढीनंतर, कॉलेबल बल्क डिपॉझिटवर वार्षिक 8% दराने, तर नॉन-कॅलेबल बल्क डिपॉझिटवर वार्षिक 8.10% दराने व्याज दिले जाणार आहे.
बचत खात्यावर जादा व्याज (High Savings Account Rate)
युनिटी बँकेकडून बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 6% व्याज दिले जात आहे, तर एक लाखापेक्षा जास्त ठेवींवर वार्षिक 6% व्याज दिले जात आहे.
मुदतपूर्व पैसे काढणे (Premature Withdrawal)
युनिटी बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, या मुदत ठेव योजनांमधून मुदतपूर्व पैसे काढण्यावर देय व्याज दर एफडीच्या कालावधीनुसार शून्य ते 1.00% पर्यंत असेल.
इतर बँकांकडून ऑफर (Other Bank's Offers)
अनेक छोट्या बँका मुदत ठेवींवर वार्षिक ८.५% दराने व्याज देत आहेत, तर युनिटी बँकेने त्यांचा FD व्याज दर वार्षिक ९% पर्यंत वाढवला आहे. अशा परिस्थितीत लवकरच इतर बँकाही एफडी व्याजदर वाढवतील अशी अपेक्षा आहे.
डिपॉझिट कालावधी | सामान्य ठेवीदारांसाठी व्याजदर | ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर |
7-14 दिवस | 4.50% | 4.50% |
15-45 दिवस | 4.75% | 4.75% |
46-60 दिवस | 5.25% | 5.75% |
61-90 दिवस | 5.50% | 6.00% |
91-180 दिवस | 5.75% | 6.25% |
181 दिवस | 8.50% | 9.00% |
182-364 दिवस | 6.75% | 7.25% |
365 दिवस (1 वर्ष) | 7.35% | 7.85% |
1 वर्ष 1 दिवस | 7.80% | 8.30% |
1 वर्ष 1 दिवसापासून 500 दिवस | 7.35% | 7.85% |