Soybean Prices Rise : मागील आठवडाभरात सोयाबीनच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोयाबीनचे भाव प्रती क्विंटल 6500 रुपयांनजीक पोहोचला आहे. सोयाबीनच्या भावात तेजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, पण जेव्हा त्याने पिकवलेल्या मालाला भाव देण्याची वेळ येते तेव्हा मात्र शेतकऱ्याला वाट बघावी लागते. पावसामुळे बेकार झालेले पीक तर अजूनच जिव्हारी लागते. कापूस, तूर, सोयाबीन हा तिन्ही पिकांपैकी सोयाबीन फार महत्वाचे ठरते कारण ते तेलबिया आहे, दैनंदिन जीवनात त्याचा वापर होतो त्यामुळे ते अत्यावश्यक आहे. सोयबिनच्या तीन जातप्रत असतात. लोकल, पिवळा, हायब्रिड या तिन्ही जात परत वेगवेगळ्या भागात पिकवल्या जातात. फेब्रुवारीमध्ये सोयाबीन 7000 वर पोहचली होती परंतु नंतर त्यात घसरण झाली आता सोयाबीनची काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.
सोयबीनच्या भावात वाढ आणि घट
शेतकऱ्याला पिकाला योग्य तो भाव मिळेल अशी आशा असते, त्यामुळे तो काढलेले पीक योग्य तो भाव मिळत पर्यंत साठवून ठेवतो, त्यात पण कधी कधी भाव वाढतो तर कधी एकदम कमी होतो. तेव्हा शेतकऱ्याकडे पर्याय नसल्याने कमी भावात विक्री करावी लागते. एखाद्या वर्षात सोयाबीनला हवा तसा भाव मिळाला की शेतकरी पुढल्या वर्षी सुद्धा सोयाबीन ची लागवड करतो, सोयाबीनची लागवड भरपूर प्रमाणात झाली की मग सोयबिनचा भाव कमी होतो. आजचे सोयाबीनचे 5500 पासून 6400 पर्यंत पोहचले. सोयबिनचा आवक वाढल्याने आधीच्या किमतीत किंचित घसरण झालेली होती पण भाव वाढीचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सोयाबीनचे भाव वाढत असताना दिसत आहे 6400 पर्यंत सोयाबीनचे भाव पोहचले आहेत 7000 पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. पावसामुळे काही सोयाबीन बेकार झाली त्यामुळे तिला योग्य भाव मिळत नव्हता आता चांगली सोयाबीन बाजारात येत असल्याने भावही वाढताना दिसत आहे. सोयाबीनचे भावचक्र पुढीलप्रमाणे,
यामध्ये एक अपवाद असू शकतो, जर सोयाबीन उत्तम दर्जाची असेल तर भाव सुद्धा योग्य मिळतो.
पावसामुळे सोयाबीनचे नुकसान
या वर्षी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले, जे सोयाबीन शेतकऱ्याच्या हाती लागली ती सुद्धा व्यवस्थित नव्हती त्यामुळे शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळाला नाही. कमी भावात सोयाबीन विक्री करावी लागली. आता मात्र साठवलेल्या सोयाबीन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत आहे आणि चांगल्या दर्जाच्या असल्याने त्याला भावही मिळत आहे. मराठवाड्यामध्ये 23 लाख 98 हजार 967 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.
सोयाबीन तेल
सोयाबीनच्या किमतीत वाढ झाल्यास सोयाबीन तेलातही वाढ होईल असे नाही, काही वेळ सोयाबीनला भाव कमी आणि तेलाचा भाव जास्त अशीही स्थिती पाहायला मिळते. 1 क्विंटल सोयाबीन मधून फक्त 15 लीटर तेल निघते. प्युअर सोयाबीन तेल हे नक्कीच वाढते. गेल्या तीन वर्षात तेल 200 रुपये लीटर पर्यंत पोहचले होते. मागील दोन वर्षातील सोयाबीन आणि सोयाबीन तेलाचे भाव पुढीलप्रमाणे,
वर्ष | सोयाबीन | तेल |
2020 | 3000 ते 5500 | 100 |
2021 | 3000 ते 10000 | 150 ते 175 |
2022 | 4000 ते 6500 | 200 ते 165 |