Sosyo Hajoori Beverages Pvt Ltd: गुजरातमध्ये मुख्यालय असलेली सोस्यो हाजुरी बेव्हरेजेस कंपनी स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झालेली आहे. या उद्योग समुहाला 100 वर्षांचा वारसा असून, कंपनीने ग्राहकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरूवातीला भारतापूरता मर्यादित असलेल्या या ब्रॅण्ड्सची उत्पादने सध्या जगभरातील 15 देशांमध्ये वापरली जात आहेत. सोस्यो हा एक आता आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड झाला आहे.
रिलायन्स रिटेल सोस्यो हजुरीमधील 50% हिस्सा खरेदी करणार!
दरम्यान, FMCG सेक्टरमधील सर्वांत मोठी कंपनी आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची (Reliance Retail Ventures Limited) पूर्ण मालकी असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (Reliance Consumer Products Limited - RCPL) कंपनीने गुजरातमधील सोस्यो हजुरी बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (Sosyo Hajoori Beverages Private Limited - SHBPL)मध्ये 50 टक्के इक्विटी स्टेक घेणार (Reliance Sosyo Acquisition) असल्याची घोषणा केली.
1923 पासून हजुरी यांच्या उद्योगास सुरूवात!
अब्बास मोहसीन हजुरी आणि अलीसगर अब्बास हजुरी हे सोस्यो हजुरी बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (Abbas Mohsin and Aliasgar Abbas Hajoori, Director, Sosyo Hajoori Beverages Pvt Ltd) कंपनीचे संचालक आहेत. कंपनीची स्थापना 1923 मध्ये गुजरातमधील सूरत शहरापासून करण्यात आली होती. कंपनी फ्रूट ज्यूस फ्लेवअर्ड सॉफ्ट ड्रिंक आणि मिक्स फ्रूट फ्लेवअर्ड ड्रिंक्सची निर्मिती करते. कंपनी प्रत्येक वर्षी 50 मिलिअन बॉटलचे उत्पादन घेत असून त्याची निर्मिती सूरतमधील प्लान्टमधून केली जाते. हे सॉफ्ट ड्रिंक्स विशेषकरून युएई, साऊथ अफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये पाठवले जाते. परदेशात पाठवल्या जाणाऱ्या या सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटल्सवर ‘An Indian Drink’ म्हणजेच भारतीय पेय असा उल्लेख असतो.
व्हिम्टो व्हाया सोस्यो!
सुरूवातीला म्हणजे 1923 मध्ये मोहसीन हाजुरी यांनी इंग्लंडमधील व्हिम्टो (Vimto) या नावाचे ड्रिंक इंडियन मार्केटमध्ये आणले होते. पण हाजुरी हे त्यावेळी महात्मा गांधी यांच्या स्वदेशी चळवळीपासून प्रेरित झाले आणि त्यांनी व्हिम्टोला सोडून स्वदेशी चव असणारे एक पेय बाजारात आणले. त्याला त्यांनी व्हिस्की नंबर असे नाव दिले होते. यामध्ये अल्कोहोलसारखी चव असल्याने त्यांनी असे नाव दिले होते. त्यानंतर त्यात बदल होत मोहसीन हाजुरी यांनी सोस्यो (Sosyo) या नावाने पेय बाजारात आणले. जे लोकांना प्रचंड आवडू लागले.
सध्या सोस्योचे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील प्लान्टमधून उत्पादन केले जाते. सोस्यो हा शब्द सोशिओ (Socio to Sosyo) या नावावरून आल्याचे सांगितले जाते. सध्या कंपनीद्वारे वापरला जाणारा सोस्यो हा शब्द लॅटिन शब्द सोशिअस (Socious) या शब्दावरून घेण्यात आला आहे. हाजुरी अॅण्ड सन्स आता सोस्यो व्यतिरिक्त अनेक प्रकारची सॉफ्ट ड्रिंक्स बनवते. यामध्ये काश्मिर सोडा, लेमी मिस्टी, लेमी ऑरेंज, सोस्यो जिरा एक्स्ट्रीम, हाजुरी सोडा, एनर्जी ड्रिंक, जिनलिन आणि ओपनर यासारखी प्रोडक्टस विकत आहे.