Reliance Sosyo Acquisition: FMCG सेक्टरमधील सर्वांत मोठी कंपनी आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची (Reliance Retail Ventures Limited) पूर्ण मालकी असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (Reliance Consumer Products Limited - RCPL) कंपनीने गुजरातमधील सोस्यो हजुरी बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (Sosyo Hajoori Beverages Private Limited - SHBPL)मध्ये 50 टक्के इक्विटी स्टेक घेणार असल्याची घोषणा केली.
कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स (Carbonated Soft Drinks) आणि ज्यूसमध्ये सुमारे 100 वर्षांचा वारसा असलेला Sosyo हा भारतीय बॅण्ड आहे. अब्बास अब्दुलरहीम हजुरी यांनी 1923 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी देशांतर्गत सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाजारपेठेतील एक प्रमुख कंपनी मानली जाते. अब्बास हजुरी आणि त्यांचा मुलगा अलियासगर हजुरी द्वारे संचालित SHBPLच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पेय ब्रॅण्ड आहेत. ज्यात Sosyo, Kashmira, Lemee, Ginlim, Runner, Opener, Hajoori Soda आणि S'eau यांचा समावेश आहे. ज्यांनी फॉर्म्युलेशन विकसित करण्यात 100 हून अधिक फ्लेवर्स लॉन्च केले आहेत. रिलायन्स कन्झ्युमरकडे 50 टक्के हिस्सा गेल्यानंतर हजुरी कुटुंबियांकडे SHBPL मधील उर्वरित म्हणजे 50 टक्के स्टेकची मालकी असणार आहे.
या गुंतवणुकीबाबत बोलताना, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक, ईशा अंबानी (Isha Ambani, Executive Director, Reliance Retail Ventures Limited) म्हणाल्या की, “ही गुंतवणूक आम्हाला स्थानिक हेरिटेज ब्रॅण्डचे सक्षमीकरण आणि त्यांना वाढीच्या नवीन संधींसह सादर करण्याचे आमचे ध्येय पुढे नेण्यास मदत करेल.”
RCPL चे उद्दिष्ट भारतीय ग्राहकांना स्वदेशी विकसित कंझ्युमर ब्रॅण्ड्स आणि त्यांच्या उत्पादनांच्या सामर्थ्याने सशक्त बनवणे हा आहे. कंपनीच्या ब्रॅण्ड पोर्टफोलिओमध्ये सध्या आयकॉनिक बेव्हरेज ब्रॅण्ड ‘कॅम्पा (Campa)’ आणि पॅकेज्ड कंझ्युमर प्रॉडक्ट्स ब्रॅण्ड ‘इंडिपेंडन्स (Independence)’ यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, RCPL त्याच्या जलद-विस्तारित ग्राहक ब्रॅण्ड पोर्टफोलिओसाठी एक वेगळे आणि समर्पित रिटेल वितरण नेटवर्क तयार करत आहे.
RCPL सोबतच्या संयुक्त उपक्रमाविषयी बोलताना, सोस्यो हजुरी बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष अब्बास हजुरी म्हणाले, “आम्हाला रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्ससोबत या भागीदारीत प्रवेश करताना आनंद होत आहे, ही एक आश्वासात्मक भागीदारी आहे; जी Sosyo ची वेगाने प्रगती होण्यास मदत करू शकतो. आमची ताकद एकत्र करून, आम्ही Sosyoची अनोखी चव प्रत्येक भारतीयाच्या जिभेवर आणू. शीतपेय क्षेत्रातील आमच्या जवळपास 100 वर्षांच्या प्रवासातील हा एक निर्णायक क्षण आहे.”