यंदा काही शेअर्सनी अतिशय चांगला परतावा दिला आहे. यात सन्मित इन्फ्रा (Sanmit Infra) स्टॉकचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. गेल्यावर्षभरात या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे.
सन्मित इन्फ्रा स्टॉक या कंपनीने महिनाभरात, सहा महिन्यात चांगला परतावा दिला आहे. वर्षभरातील कामगिरीचा विचार केला तरीही या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे. वर्षभरात किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
मंगळवारी ‘असा’ होता Sanmit Infra चा भाव
मंगळवारीही या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली. बाजार बंद होताना 76.80 रुपये इतकी किमत होती. यात 1.12 टक्के इतकी वाढ झाली आहे. गेल्या महिनाभराचा विचार केला तरी या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. महिन्याभरात तब्बल 9.15 टक्के इतकी वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी 70.30 असणारा दरामध्ये 6 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे.
वर्षभराचा विचार केला तर Sanmit Infra ने 187.04 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. वर्षभरापूर्वी 26 रुपये 30 पैसे असणारा दर आता 76.80 पर्यंत जाऊन पोचला आहे. यात 50.50 इतकी घवघवीत वाढ झाली आहे. गेल्या 52 आठवड्यातील नीच्चांकी दर 25. 54 तर उच्चांकी दर 85.70 टक्के इतका राहिला आहे.
5 वर्षापूर्वी 12 रुपये इतका दर
Sanmit Infra ची थोडी आणखी मागे जाऊन कामगिरी बघणे आवश्यक आहे. 5 वर्षापूर्वी हा शेअर 12 रुपयांपेक्षा कमी होता. 5 वर्षांमध्ये यात 65 रुपयांची वाढ झाली आहे.
शेअर बाजारात यंदाच्या वर्षी Sanmit Infra ने चांगली उसळी घेतली आहे. याचा अनेक गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. सन्मित इन्फ्रा स्टॉक लहान कंपनी आहे. बरेचदा शेअर बाजारात गुंतवणूक करताना लहान कंपन्यांकडे दुर्लक्ष होते. अशी शेअर्समध्ये चमकदार वाढ झाल्यावर ते सगळ्यांच्या लक्षात येऊ लागतात.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)