• 28 Nov, 2022 16:06

SIP: मध्ये किती काळ गुंतवणूक करावी लागते?

SIP

जेव्हा आपण mutual fund मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा आपणाला त्यात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग मिळतात. एक म्हणजे Lumpsum investment म्हणजेच एक रकमी गुंतवणूक आणि दुसरा मार्ग म्हणजे SIP द्वारे गुंतवणूक. SIP मध्ये किती काळ गुंतवणूक करावी लागते? याबद्दल सविस्तर वाचा.

SIP: सिस्टेमैटिक इन्वेस्टमेंट प्लान (एसआयपी), जसे बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये आरडी असते, त्याचप्रमाणे mutual  फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मार्ग म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP), याला सामान्यतः SIP असे संबोधले जाते. येथे mutual फंडांमध्ये एका विशिष्ट पद्धतीने पैसे गुंतवले जातात, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे returns  अनेक पटीने वाढतात. जर तुम्हाला एसआयपीचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर जाणून घ्या की दरमहा 500 रुपयांची गुंतवणूक सहजपणे 10 लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. Equity fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बहुतेक गुंतवणूकदार पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) पसंत करतात. अलीकडच्या काळात एसआयपीला बरीच लोकप्रियता मिळाली आहे. याचे कारण असे आहे की लोकांना त्याच्या अनेक सामान्य फायद्यांची जाणीव झाली आहे. जेव्हा आपण mutual fund मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा आपणाला त्यात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग मिळतात. एक म्हणजे Lumpsum investment म्हणजेच एक रकमी गुंतवणूक आणि दुसरा मार्ग म्हणजे SIP द्वारे गुंतवणूक.
 

SIP म्हणजे एखादी स्कीम आहे असा गैरसमज अनेक लोकांचा असतो. परंतु तसे अजिबात नहीं SIP समजून घेणे एवढेही अवघड नाही जेवढे दिसत असते. एसआयपी म्हणजे काही कसले रॉकेट सायन्स नाही जे समजायला अवघड जाईल. Mutual fund मध्ये गुंतवणूक करण्याचा हा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदार कमीतकमी रक्कम सातत्याने गुंतवू शकतो. म्हणजेच यामध्ये ५०० रुपयांपासून देखील SIP चालू करता येऊ शकते.काही फंड मध्ये तर ही किमान रक्कम ५०० पेक्षा देखील कमी असलेली पहावयास मिळते. परंतु साधारणतः गुंतवणुकदार कमीत कमी ५०० आणि जास्तीत जास्त त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही रकमेची गुंतवणूक करू शकतो.
 

गुंतवणूक किती काळ करावी ?

SIP चा कालावधी म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याची SIP किती कालावधी पर्यंत चालू ठेवायची आहे तो काळ. म्हणजेच यामध्ये गुंतवणूकदाराला आपली SIP एक वर्षासाठी, दोन वर्षासाठी, ५ किंवा १० वर्षांसाठी किंवा जोपर्यंत तो स्वतः SIP बंद करत नाही तोपर्यंत SIP चालू ठेवायची आहे हे ठरवावे लागते. या तीन गोष्टी SIP करताना प्रामुख्याने विचारात घेतल्या जातात. यामध्ये गुंतवणूकदाराला सुरवातीला रक्कम ठरवावी लागते त्यानंतर आपली SIP हप्त्याची तारीख निवडणे आणि मग SIP चा कालावधी ठरवावा लागतो. SIP फायदे ही आपल्याला अनुभवता येतात अल्प short term साठी असले तरी रिस्क ही येतेच.
 

SIP चे फायदे 

  1. किमान रकमेतील गुंतवणूक minimum investment in SIP
  2. एसआयपी मधील तरलता Liquidity in SIP
  3. अधिक परतावा Good return on investment
  4. एसआयपी मधील लवचिकता Flexibility in SIP
  5. कमी प्रमाणातील जोखीम Low risk SIP