• 28 Nov, 2022 16:55

Best SIP Plan: बाळाच्या जन्मापासूनच करा त्याच्या भविष्याची तयारी; मुलांच्या शिक्षणासाठी निवडा बेस्ट SIP Plan!

best SIP plan for Children's education

Best SIP Plan: ज्या दिवशी तुम्ही एका बाळाचे आई वडील होता, तो दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. त्यामुळे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन सुरू करण्याचा सगळ्यात चांगला दिवसही तोच ठरू शकेल.

SIP Plan For Children: बाळाचा जन्म म्हणजे त्या दिवसापासून तुमच्यावरील जबाबदारी आणखी वाढते. मुलाला मोठं करून त्याचे शिक्षण पूर्ण करणे ही आताची सर्वात मोठी जबाबदारी आहे. शिक्षणात अनेक बदल घडून आले, नवनवीन बाबींचा समावेश झाला. त्यासोबतच महागाईसुद्धा वाढली. शिक्षणावरील महागाई 11 टक्क्यांनी वाढली हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाची सोय आतापासूनच करू शकता. वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी उच्च उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करणे हा एकमेव पर्याय आहे. (SIP Plan for Children's Education)

मुलांच्या शिक्षणासाठी अनेक SIP योजना आहेत. जर तुम्ही त्या मुलाच्या जन्मापासूनच अंमलात आणल्या तर मुलाच्या भविष्याची काळजीच उरणार नाही. SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ही एक अशी सुविधा आहे; जी गुंतवणूकदारांना सिस्टिमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडद्वारे ऑफर केली जाते.

SIP मुळे शिक्षणाच्या खर्चाचे नियोजन कसे होऊ शकते?

NSSO (नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन)च्या अहवालानुसार 2008 ते 2014 या कालावधीत शिक्षणाचा वार्षिक खर्च मागील कालावधीपेक्षा 2.75 पटीने वाढला आहे. याच कालावधीत दरडोई उत्पन्नात फक्त 2.49 पट वाढ झाली, त्यामुळे जमा-खर्चाचे संतुलन बिघडले आहे.

हा ट्रेंड भविष्यातही असाच चालू राहील. वाढत्या शैक्षणिक खर्चाचे नियोजन करण्यासाठी बचत आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडासाठी एसआयपी (SIP in Equity Mutual Fund) शक्य तितक्या लवकर सुरू करून कंपाऊंडिंगमधून जास्तीत जास्त उत्पन्न घेणे.


तुम्ही नियमित SIP च्या गुंतवणुकीद्वारे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी मोठा निधी मिळवू शकता. तुम्ही सुरुवातीला रु. 500 ने एसआयपी सुरू करू शकता आणि मजबूत कॉर्पससाठी तुम्ही दरवर्षी त्यात वाढ करू शकता. एसआयपीची टॉप-अप सुविधा देखील तुम्ही वापरू शकता. तुम्हाला चक्रीवाढीचा देखील फायदा होऊ शकतो. 

उदाहरणार्थ, 2000 रुपये प्रति महिना एसआयपी तुम्हाला 27.3 लाख रुपये मिळवून देऊ शकते, जर तुम्ही बाळाच्या जन्माच्या वेळी एसआयपी सुरू कराल आणि 18 वर्षे सुरू ठेवाल, ज्या वयात तुमचे मूल शाळेनंतर कॉलेजमध्ये जाते. विचारात घेतलेले इतर व्हेरिएबल्स म्हणजे 11.05 लाख रुपयांच्या एकूण गुंतवणुकीसाठी दरवर्षी 10% गुंतवणूक वाढते आणि सरासरी वार्षिक परतावा साधारण 12% असतो.

मुलांच्या शिक्षणासाठी योग्य एसआयपी प्लॅन कसा निवडावा?

एसआयपी निवडण्याआधी लक्षात घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे सर्वात आधी तुमचा वेळ,  उत्पन्न, कॉर्पस आणि जोखीम इत्यादि. शेवटी, तुम्हाला तुमच्या मुलासाठी करायच आहे म्हणजे ते बेस्टच पाहिजे असणार. फक्त एकाच फंडापासून सुरुवात करणे आणि हळूहळू त्यात हवे तसे बदल करून सर्व योजनांमध्ये प्रमाणानुसार गुंतवणूक करणे हा पर्याय योग्य आहे.

फंडाचे नाव

AUM (रु)

खर्चाचे प्रमाण

वार्षिक उत्पन्न

ABSL फ्रंटलाइन इक्विटी फंड 

18897.76 कोटी 

 

1.08

14.85

अॅक्सिस दीर्घकालीन इक्विटी फंड 

28556.83 कोटी 

0.72

14.85

 

पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड 

8701.65 कोटी 

0.96 

 

21.11

SBI इक्विटी हायब्रिड फंड 

38080.12 कोटी 

0.97

12.20

SBI फोकस्ड इक्विटी फंड 

14533.37

0.97 

13.08

अॅक्सिस ब्लूचिप फंड 

25134.85

0.55 

 

NA

L&T मिडकॅप फंड 

 

6258.04 कोटी 

0.77

7.25 (3वर्ष)

HDFC मिडकॅप संधी निधी 

25779.00 कोटी 

1.04

7.94 (3वर्ष)

अॅक्सिस स्मॉल कॅप फंड 

4727.14 कोटी 

0.38

17.37 (3वर्ष)

 

HDFC स्मॉल कॅप फंड 

10024.44 कोटी 

0.95

5.88 (3वर्ष)

टीप: AUM = व्यवस्थापनाखालील मालमत्ता किमान SIP रक्कम रु. 100 ते रु 1,000 पर्यंत असते. 

तुमच्‍या मुलाच्‍या शिक्षणासाठी SIP ची निवड कोणतीही करा, पण ती लवकरात लवकर करण्याला महत्व आहे. तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी अधिक आणि पाहिजे तेवढी शिदोरी जमवून ठेवण्यासाठी मग दरवर्षी SIP रक्कम वाढविण्याचा प्रयत्न करा. जरी एसआयपी महागाईला मुबलक परतावा देत असली तरी,  मुलाच्या आवडीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक बाजू प्रबळ असणे आवश्यक आहे.