Shark Tank India Update: शार्क टॅंक इंडिया 2 हा बिझनेससंबंधी रियालिटी शो प्रेक्षकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. या शो मध्ये अधिक नवउदयोजक आपली आयडिया शार्कसमोर शेयर करतात. यंदा मात्र आपली बिझनेस आयडिया घेऊन कुणी तरूण नाही, तर चक्क एक 85 वर्षांचे आजोबा आयुर्वेदिक तेलची बिझनेस आयडिया घेऊन शार्क टॅंक इंडियाच्या मैदानात उतरले आहेत. चला, तर पाहुयात त्यांनी यामध्ये विजय मिळविला का?
85 वयाच्या आजोबांची बिझनेस आयडिया (85 year old Grandfather's Business Idea)
शार्क टॅंक इंडियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये 85 वर्षाचे आजोबा हे आयुर्वेदिक तेलाची डील घेऊन शार्क्ससमोर आले होते. त्यांचे नाव आर. के. चौधरी असे आहे. त्यांच्या हेअरकेअर आणि स्किनकेअर कंपनीचे नाव Avimee Herbal असे आहे. त्यांनी तयार केलेल्या आयुर्वेदिक तेलने 85 व्या वर्षी डोक्यावर केस उगवतील असा दावा त्यांनी केला आहे. कारण हे तेल मी स्वत:च्या डोक्याला वापरून पाहिले आहे. माझा पूर्वी संपूर्ण टक्कल होता, आता मात्र केस उगवू लागले आहेत, असे त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
शार्कची प्रतिक्रिया
85 वर्षाच्या आजोबा आर. के चौधरी यांनी आयुर्वेदिक तेलाच्या व्यवसायामध्ये 2.8 कोटी रूपयांसाठी 0.5 टक्के इक्विटीची मागणी केली होती. पण परिक्षक अमन गुप्ता, नमिता थापर व पियुष बंसल यांनी डील करण्यास थेट नकार दिला. तर अमित जैन यांनी 1.1 कोटी रूपयांवर 2.5 टक्के इक्विटीची आॅफर दिली. तर बोट (BoAt)चे संस्थापक अनुपम मित्तल यांनीदेखील 70 लाख रूपयांवर 2 टक्के इक्विटीची आॅफर दिली. मात्र हे 85 वर्षाचे आजोबा 2.8 कोटी रूपयांवर 1.5 टक्के इक्विटीपेक्षा कमीमध्ये डील करण्यास तयार नाहीत. पण त्यांच्या या आयुर्वेदिक तेलाची कल्पना पाहून परिक्षकांसोबतच प्रेक्षकदेखील थक्क झाले होते.