Bigg Boss 16: 2022 च्या अखेरीस सर्वाधिक चर्चेत असणारा रियालिटी शो म्हणजे ‘बिग बॉस 16.’ (Big Boss 16) हा शो आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या शो ची वाढती लोकप्रियता पाहून या शो ची अंतिम तारीखदेखील पुढे ढकलण्यात आली आहे. चला, तर मग लोकप्रिय शो मधील स्पर्धकांचे मानधन पाहुयात.
Table of contents [Show]
शिव ठाकरे (Shiv Thakare)
मराठी बिग बॉस 2 चा विजेता शिव ठाकरे हा हिंदी बिग बॉसमध्येदेखीलआपला जलवा दाखवित आहेत. या शो मुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याशो मध्ये शिवला दर आठवडयाला 5 लाख रूपये इतके मानधन मिळते.
रॅपर एमसी स्टॅन (MC Stan)
रॅपर एमसी स्टॅनचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. सध्या तो त्याच्याबोलण्याच्या स्टाइलने प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. एमसी हा दर आठवडयाला 7लाख रूपये इतकी कमाई करतो.
अब्दु रोजिक (Abdu Rozik)
बिग बॉस 16 मधील सर्वात लोकप्रियस्पर्धक म्हणजे अब्दु रोजिक. अब्दु हा दर आठवडयाला साधारण 3 ते 4 लाखरूपये कमवितो. साजिद खान (Sajid Khan) साजिद खान हे यावर्षीच्या सिझनमधील मोठं नाव आहे. साजिद दर आठवडयाला 5 लाख रूपये इतकी कमाई करतो.
प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary)
बिग बॉस 16 मधील सर्वात तगडी स्पर्धक म्हणून प्रियंका चहर चौधरीकडे पाहिले जाते. ही स्पर्धक दर आठवडयाला जवळपास 5 ते 7 लाख रूपये कमविते.
टीना दत्ता (Tina Dutta)
टीना दत्ताला ‘उतरण’ मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सध्या बिग बॉस 16 मध्ये दर आठवडयाला तिला 8 ते 9 लाख रूपये इतके मानधन मिळते.
सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan)
सुंबुल तौकीर खान या सीझनमधील सर्वात महागडी स्पर्धक आहे. ही दर आठवडयाला जवळपास 12 लाख रूपये इतकी कमाई करते.