Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India 2 Judges Property: जाणून घ्या, शार्क टॅंक इंडियाच्या परिक्षकांची एकूण संपत्ती

Shark Tank India 2 Judges Property

Shark Tank India 2: जानेवारीच्या पहिल्याच आठवडयात शार्क टॅंक इंडियाचा दुसरा सीझन सुरू होत आहे. याचा पहिला सीझन खूप लोकप्रिय झाला होता. या शो बरोबरच या कार्यक्रमातील जजदेखील सुपरहीट झाले होते. पण तुम्हाला माहिती आहे का, या बिझनेसमॅनची एकूण संपत्ती किती आहे. चला, तर या मग यशस्वी उदयोजकांचे वार्षिक उत्पन्न जाणून घेऊयात.

Shark Tank India Judges Property: शार्क टॅंक इंडिया या शोची प्रेक्षक मोठया आतुरतेने वाट पाहत आहे. या शो चा मोठा चाहता वर्ग आहे. सोबतच या कार्यक्रमातील परिक्षकदेखील तितकेच सुपरडुपरहीट आहे. यांच्या चाहत्यांमध्येदेखील मोठी वाढ झाली आहे. आता हे बिझनेसमॅन सेलेब्रिटी लाइफ जगत आहेत. या बिझनेमॅन परिक्षकांचे वार्षिक उत्पन्न थोडक्यात पाहुयात.

पीयुष बंसल (Peyush Bansal) 

'लेन्सकार्ट'चे सीईओ पीयुष बंसल यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे. 36 वर्षीय पियुष बंसल यांनी इनफेडो (inFedo) आणि डेली ऑब्जेक्ट्स  (dailyobjects.com) सारख्या कंपन्यांमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.

अनुपम मित्तल (Anupam Mittal)

देशातील लोकप्रिय साइट शादी डॉट कॉम (Shaadi.com) आणि ऑनलाइन रिअल इस्टेट पोर्टल (Makaan.com) ची मूळ कंपनी, पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल यांची वार्षिक उलाढाल 185 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, अमन मित्तल यांनी OLA मध्येही गुंतवणूक केली आहे.

विनिता सिंग (Vineeta Singh)

'शुगर कॉस्मेटिक्स'च्या सीईओ आणि सह-संस्थापक (CEO Sugar Cosmetics) विनिता सिंग आहेत. यांनी करोडोची नोकरी सोडून बिझनेस करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय योग्य ठरत, आज त्यांच्याजवळ अंदाजे एकूण संपत्ती 300 कोटी रुपये आहे. 37 वर्षीय विनिता या 'फॅब बॅग'च्या सह-संस्थापकदेखील आहेत.

नमिता थापर (Namita Thapar)

नमिता थापर या एम्क्योर फार्मास्युटिकल्स या बहुराष्ट्रीय औषध कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्याची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे. ती Incredible Ventures Limited च्या संस्थापक देखील आहेत.

अमन गुप्ता (Aman Gupta)

2015 मध्ये स्थापन झालेल्या 'बोट' (Boat) या लोकप्रिय टेक ब्रँडचे सह-संस्थापक आणि CMO, अमन गुप्ता यांची अंदाजे एकूण संपत्ती 700 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, अमन गुप्ता यांचे बमर, शिप्रॉकेट आणि अन्वेशन यांसारख्या कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत.