भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेले अनेक समभाग चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. Servotech Power Systems या शेअरनेही वर्षभरात चांगला परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचे आता विभाजन होणार आहे.
1:5 प्रमाणात होणार शेअरचे विभाजन
Servotech Power Systems कंपनीच्या संचालक मंडळाने 1:5 या प्रमाणात शेअर विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. यानुसार 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरच्या उपविभागास मान्यता मिळाली आहे. 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला इक्विटी शेअर विभागला जाईल. याचे दर्शनी मूल्य 2 रुपये असेल.
Servotech Power Systems चे शेअर रिटर्न्स
कंपनीच्या शेअर्सने वर्षभरात खूपच आकर्षक परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी 54 रुपये असणारा हा शेअर 164.25 रुपयांवर पोचला आहे. एका वर्षात 207.82 टक्के इतका परतावा दिला आहे. गुरुवारी बाजार बंद होताना या शेअरचा भाव 164.25 इतका होता. गेल्या आठवड्याभरात या शेअर्सच्या किमतीत किंचित घट झाली आहे. 1.60 टक्के म्हणजे 2.65 रुपयांनी भाव उतरले आहेत. बुधवारच्या तुलनेतही गुरुवारी किंचित घसरण झाली. 1.15 रुपयांनी घसरण झाली. मात्र वर्षभरात या शेअर्सने खूपच चमकदार परतावा दिला आहे. गेल्या 52 आठवड्यातला उच्चांक 188.80 इतका तर नीच्चांक 45.10 इतका राहिला आहे.
2017 मध्ये 31 रुपये प्रती शेअरवर सूचीबद्ध होता. त्यापेक्षा पाचपट वाढ या शेअर्सच्या किमतीमध्ये झाली आहे. यामुळे या कंपनीच्या आयपीओ गुंतवणूकदारांना याचा चांगला फायदा झाला आहे.
आता या कंपनीच्या शेअर्सचे विभाजन होणार आहे. कंपनीच्या बोर्डाने 7 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिटच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे, असे सर्वोटेक पॉवर सिस्टिम लिमिटेडच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)