Serbia to bar visa-free travel: नवीन वर्षात सर्व भारतीय प्रवाशांना सर्बियामध्ये जाण्यासाठी व्हिसासाठी(Visa) अर्ज करावा लागेल. बेकायदेशीर होणारे स्थलांतर(illegal migration) नियंत्रित करण्यासाठी आणि युरोपियन व्हिसा धोरणाचे पालन(European visa policy) करण्यासाठी सर्बिया सरकारने(Serbia Govt) भारतीयांसाठी विना व्हिसा फ्री एन्ट्री सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2023 पासून भारतीय पासपोर्ट धारकांना वैध व्हिसाशिवाय सर्बियाला जाण्याची सुविधा यापुढे मिळणार नाही.
सप्टेंबर 2017 मध्ये सर्बियाने व्हिसा फ्री एन्ट्री सेवा पर्यटकांसाठी सुरु केली होती. सर्बियाला जाणारे भारतीय सर्बियातील विना व्हिसा फ्री एन्ट्री सेवेच्या आधारावर सर्बियाच्या शेजारील देशांसह इतर युरोपीय देशांना प्रवास करू शकत नाहीत.
यापूर्वी किती दिवस राहण्याची परवानगी होती?
यापूर्वी, राजनैतिक आणि अधिकृत भारतीय पासपोर्ट धारकांना 90 दिवसांसाठी व्हिसाशिवाय सर्बिया देशात येण्याची परवानगी होती, तर सामान्य पासपोर्ट धारकांसाठी हा कालावधी 30 दिवसांचा निर्धारित करण्यात आला होता. मात्र सध्या सर्बिया सरकारने 30 दिवसांपर्यंत राहण्यासाठी सर्व भारतीय पासपोर्ट धारकांना विना व्हिसा फ्री एन्ट्री मागे घेतली आहे. त्यामुळे यापुढे सर्बियामध्ये प्रवास करणाऱ्यांना व्हिसासाठी अर्ज करावा लागणार आहे.
पाच वर्षांपासूनची विना व्हिसा फ्री एन्ट्री बंद
सर्बिया सरकारने सप्टेंबर 2017 मध्ये विना व्हिसा फ्री एन्ट्री सेवा सुरू केली होती. सर्बियाला जाणारे भारतीय सर्बियातील विना व्हिसा फ्री एन्ट्री सेवेच्या आधारावर शेजारील देशांसह इतर युरोपीय देशांमध्ये प्रवास करू शकत नाहीत. सर्बिया सरकारच्या घोषणेनंतर, बेलग्रेड येथील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
2023 मधील नवीन नियम काय?
1 जानेवारी 2023 पासून, सर्बियाला जाणार्या सर्व भारतीय नागरिकांना सर्बिया देशामध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असेल. सर्बिया सरकारने 30 दिवसांपर्यंत राहण्यासाठी सर्व भारतीय पासपोर्ट धारकांना विना व्हिसा फ्री एन्ट्री मागे घेतली आहे. 1 जानेवारी 2023 रोजी किंवा त्यानंतर सर्बियाला भेट देणार्या भारतीय नागरिकांना नवी दिल्लीतील सर्बियाच्या दूतावासात किंवा त्यांच्या निवासस्थानी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. अॅडव्हायझरीमध्ये असेही म्हटले आहे की वैध शेंजेन, यूके व्हिसा किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका व्हिसा असलेले किंवा या देशांमध्ये रहिवासी स्थिती असलेले भारतीय 90 दिवसांपर्यंत सर्बियामध्ये प्रवेश करू शकतात.