आठवड्याच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात देशांतर्गत शेअर बाजारात तेजीने झाली. यादरम्यान सेन्सेक्स सुमारे 400 अंकांनी वाढला होता. दुसरीकडे निफ्टी 17700 च्या आसपास व्यवहार करताना दिसत आहे. सुरुवातीच्या कालावधीत सेन्सेक्स वाढीसह 60,200 अंकांच्या पुढे ट्रेड करताना दिसत होता. दुसरीकडे, सुरुवातीच्या कालावधीत निफ्टी 61 अंकांच्या वाढीसह 17660 च्या पातळीवर ट्रेड करताना दिसत होता. टायटनचे शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात 5% वाढ दाखवत आहेत. तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 10% पर्यंत घसरत आहेत. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 417 अंकांनी वाढून 60350 वर तर निफ्टी 111 अंकांनी वाढून 17721 वर आणि बँक निफ्टी 350 अंकांनी वाढून 41019 वर उघडला.
अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग अहवालाला इतके दिवस उलटूनही बाजारावर त्याचा परिणाम सुरूच आहे. गुरुवारच्याही व्यापार सत्रातील चढ-उतारात सेन्सेक्स 224.16 अंकांच्या वाढीसह 59,932.24 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. त्याच वेळी, निफ्टी 5.90 अंकांच्या घसरणीसह 17610.40 अंकांच्या पातळीवर बंद झाला. अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण गुरुवारीही कायम राहिलेली दिसून आली. कंपनीचे बहुतांश शेअर लोअर सर्किटला लागले, तसेच एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सनीही वाढ दर्शविली होती.
काल मात्र सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग अहवालाला इतके दिवस उलटूनही बाजारावर त्याचा परिणाम सुरूच राहिलेला दिसून येत आहे. गुरुवारच्या व्यापार सत्रातील चढ-उतारात सेन्सेक्स 224.16 अंकांच्या वाढीसह 59,932.24 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे निफ्टी 5.90 अंकांच्या घसरणीसह 17610.40 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.