सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण पाहायला मिळाली. या काळात आयटीसी, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या समभागांनी वाढ दाखवली. स्टेट बँक, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये घट दिसून आली.
गुरुवारी सकाळी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. यादरम्यान सेन्सेक्स 249 अंकांच्या घसरणीनंतर 59459 वर उघडला, तर निफ्टी 17517 अंकांच्या पातळीवर उघडला. मात्र, थोड्याच वेळात बाजाराने काहीशी वाढ साध्य केली. सुरुवातीच्या तासात सेन्सेक्स 15.92 अंकांच्या घसरणीसह 59,688.18 अंकांच्या पातळीवर ट्रेड करताना दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 52.90 अंकांच्या घसरणीसह 17,563.40 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.
अदानी समूहाच्या शेअर्सची आधी अप्पर तर नंतर लोअर सर्किटला धडक
गुरुवारी सेन्सेक्समध्ये व्यवहार सुरू होताच अदानी समूहाच्या समभागांनी प्रथम अपर सर्किटला धडक दिली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सने दोनदा लोअर सर्किटला धडक दिली. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण देखील पाहायला मिळाली. या काळात आयटीसी, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या समभागांनी वाढ नोंदवली होती. स्टेट बँक, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये घट दिसून आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिटीग्रुपने अदानी सिक्युरिटीजच्या मार्जिन लोनवर स्थगिती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रेडिट सुईसनेही आदल्या दिवशी अदानी समूहाचे रोखे घेण्यास नकार दिला होता. रिझव्र्ह बँकेने अदानी समुहाशी संबंध असलेल्या विविध बँकांकडून तपशील मागितल्याचे वृत्त आहे.