सोमवारी सकाळपासून शेअर बाजारात घसरण बघ्याला मिळत आहे. देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी लाल चिन्हाने व्यवहार सुरू झाला. सध्या सेन्सेक्स 455 अंकांच्या घसरणी अंकांच्या घसरणीसह 60386 अंकांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, निफ्टीमध्ये देखील घसरण होत सकाळच्या वेळेत तो 17795.40 अंकांवर व्यवहार करताना दिसत होता. सोमवारी निफ्टी 17812 च्या अंकावर तर सेन्सेक्स 60350 अंकांवर उघडला आहे. बाजारात सर्वाधिक घट ही आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एमपीसी बैठकही सोमवारपासून सुरू होणार असल्याने त्याकडे देखील गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. यापूर्वी डिसेंबरच्या चलनविषयक धोरण आढाव्यात मध्यवर्ती बँकेने प्रमुख धोरण दर म्हणजे रेपो दर 0.35% ने वाढवले होते. या कालावधीत डॉलरच्या तुलनेत रुपया 35 पैशांनी कमजोर झाला आणि 82.43 वर व्यवहार करताना दिसला.
गेल्या आठवड्यात सेंसेक्समध्ये वाढ दिसत होती. शुक्रवारीही सलग पाचव्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाला होता. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 909.64 अंकांनी वाढून 60,841.88 अंकावर बंद झाला. तसेच निफ्टी 243.65 अंकांनी वाढून 17,854.05 वर बंद झाला होता. तसेच, निफ्टी बँक 830 अंकांनी वधारून 41,500 अंकावर बंद झाला होता. टायटन आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स अनुक्रमे 7 टक्के आणि 6 टक्क्यांनी वाढलेले बघायला मिळाले. आता या आठवड्यात शेअर बाजार कसा पुढे जातो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे हिरव्या चिन्हासह बाजार बंद होणार की मार्केटमध्ये घसरण होईल, याकडे गुंतवणूकदार लक्ष ठेऊन आहेत.