आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय घोषणा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बुधवारी सेन्सेक्स 451.27 अंकांच्या वाढीसह 60,001.17 अंकांच्या पातळीवर उघडला. त्याच वेळी, निफ्टीमध्ये 17,811.60 अंकांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाला आहे. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वधारून 81.78 वर पोहोचला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केलेली दिसून येत आहे. बुधवारी बाजार उघडण्याच्या वेळी सेन्सेक्सने 450 अंकांपर्यंत वाढ दर्शवली. 10.45 च्या सुमारास तो 516 अंकांच्या वाढीसह 59,963 अंकांवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी, निफ्टी 107 अंकांच्या वाढीसह 17707 अंकांवर व्यवहार करत आहे. याआधी बुधवारी सेन्सेक्स 451.27 अंकांच्या वाढीसह 60,072 अंकांवर पोचला होता. निफ्टीमध्ये 17,811.60 अंकांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाला. यानंतर 10.45 च्या सुमारास 18381 अंकावर पोचला होता. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वधारून 81.78 वर पोहोचला.
आयसीआयसीआय बँक, कोटक बँक अशा बँका वाढीसह ट्रेड करताना दिसत होत्या. अर्थसंकल्प प्रत्यक्ष सादर होऊ लागल्यावर बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे महत्वाचे ठरणार आहे. उद्योग जगताबाबत काय घोषणा होतात, अर्थसंकल्पातील तरतुदी कुठल्या सेक्टरसाठी हितकारक ठरतात याकडे बाजाराचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे.