जागतिक बाजारातील परिस्थितीचा भारतावर परिणाम झाला. भारतीय बाजार लाल चिन्हावर बंद झाला. बाजार सकाळी लाल चिन्हावरच उघडला होता. सोमवारी बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. यादरम्यान सेन्सेक्स 334.98 अंकांनी घसरला आणि 60,506.90 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, 50 शेअर्सचा निफ्टी निर्देशांक 89.45 अंकांनी घसरून 17,764.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला. बँक निफ्टीने 125.05 अंकांची घसरण नोंदवली आणि तो 41370.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, आयटीसी आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स हिरव्या चिन्हावर बंद झाले, तर अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स आणि एलअँडटी लाल चिन्हावर तोट्यासह बंद झाले.
अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, बीपीसीएल, अपोलो हॉस्पिटल्स आणि हिरो मोटोकॉर्प हे आठवड्याच्या पहिल्या दिवशीच्या व्यवहाराच्या शेवटी निफ्टी वाढले. तर Divi Labs, JSW स्टील, Hindalco, Tata Steel आणि Ifosys या कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले.सोमवारी सकाळपासून शेअर बाजारात घसरण बघायला मिळत आहे. देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी लाल चिन्हासह ट्रेड सुरू झाला. सुरुवातीच्या कालावधीतच 455 अंकांची घसरण बघायला मिळाली. दुसरीकडे, निफ्टीमध्ये देखील सकाळच्या वेळेतही घसरण झालेली दिसून आली. सोमवारी निफ्टी 17812 च्या अंकावर तर सेन्सेक्स 60350 अंकांवर उघडला. आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये सकाळी घट दिसून आली.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            