Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Fall: शेअर बाजारात 2023 मधील पहिली मोठी घसरण

Share Market Crash

Share Market Crash: बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 61 हजार 294 च्या पातळीवर तर निफ्टी 18 हजार 230 अंकांच्या पातळीवर उघडला. मात्र, सुरुवातीपासूनच यूएस फेडच्या व्याजदरांबाबतच्या निर्णयाचा दबाव बाजारावर दिसून आला, ज्याचा परिणाम नेमका कसा झाला ते पुढे वाचा.

Nifty ends below 18,100, Sensex falls 636 points: वर्ष 2023 ची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी चांगली होती, परंतु बुधवारी त्यात या वर्षातील पहिली मोठी घसरणही पाहायला मिळाली. दिवसाच्या शेवटी बीएसईचे (Bombay Stock Exchange) सेन्सेक्स 650 अंकांच्या घसरणीसह बंद झाले, तर या घसरणीचा सर्वाधिक फटका दिल्लीवेरी, झोमॅटो आणि येस बँकेच्या गुंतवणूकदारांना बसला.

सेन्सेक्स 650 अंकांनी घसरला (Sensex fell by 650 points)-

नवीन वर्षाच्या पहिल्या व्यापारी आठवड्यातील पहिल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने वाढ होत होती. मात्र हा ट्रेंड तिसऱ्या दिवशीही कायम राहू शकला नाही. बुधवारी सेन्सेक्समध्ये अशी घसरण झाली की गुंतवणूकदारांची लाखो कोटींची संपत्ती बुडाली. व्यवहारादरम्यान, बीएसईचा हा 30 समभाग निर्देशांक 650 अंकांपर्यंत तुटला होता. तथापि, नंतर घसरण थोडी कमी झाली आणि व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 636.75 अंकांनी किंवा 1.04 टक्क्यांनी घसरून 60 हजार 657.45 वर बंद झाला.

निफ्टीही 190 अंकांनी घसरला (Nifty fell by 190 points)-

सेन्सेक्ससोबतच निफ्टीचीही (National stock exchange) घसरण झाली आहे. दिवसाअखेरीस 190 अंकांनी अर्थात 1.04 टक्क्यांनी घसरून 18,042.95 वर बंद झाला. चीनमधील वाढती कोरोनाची प्रकरणे (China Covid) आणि यूएस फेडच्या व्याजदरांसंदर्भात उचलले जाणारी पावले याचा गुंतवणूकदारांवर परिणाम होत आहे. तसेच सध्या,  फेडरल ओपन मार्केट कमिटीद्वारे व्याजदरात मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे ही घसरण पाहायला मिळत आहे. तसेच, मंगळवारी युएस स्टॉक एक्सेचेंजमध्ये (US Stock Exchanges) मंगळवारी पडले होते, याचाही परिणाम म्हणून आज ही घसरण पाहायला मिळत आहे, असे गुंतवणूक सल्लागार विवेक नाडकर्णी यांनी सांगितले.

या शेअर्समध्येही घसरण (These shares also fell)-

शेअर बाजार बंद होताना, गेल्या अनेक दिवसांपासून चढत्या क्रमात व्यवहार करत असलेल्या येस बँकेचा शेअर 3.40 टक्क्यांनी अर्थात 0.75 रुपयांनी घसरला आणि 21.30 रुपयांवर बंद झाला. तर, डिलिव्हरीचा स्टॉक 3.01 टक्क्यांनी म्हणजे 10.15 रुपयांनी घसरत, पुढे 327.30 रुपयांवर बंद झाला. यासह एचडीएफसी ( HDFC Twins), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), इन्फोसिस (Infosys), आयटीसी (ITC), एलएनटी (Larsen & Toubro), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), पॉवर ग्रीड (PowerGrid) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) आदी कंपन्यांचे शेअर घसरले आहेत.