• 05 Jun, 2023 18:18

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD for Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळतंय 9.11 टक्के व्याज, काय आहे बँकेची स्कीम?

FD for Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळतंय 9.11 टक्के व्याज, काय आहे बँकेची स्कीम?

FD for Senior Citizen : मुदत ठेव म्हणजेच एफडीवर चांगलं व्याज हवं असेल तर विविध वित्त संस्था, बँकांच्या योजना आहेत. मात्र 7-8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळताना दिसत नाही. अशात अशी एक मुदत ठेव योजना उपलब्ध झालीय, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 9.11 टक्के व्याज दिलं जातंय. काय आहे योजना, पाहू...

तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) असाल आणि मुदत ठेव योजनेत (Fixed deposit) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांगला परतावा किंवा चांगला व्याज दर तुम्हाला दिला जाणार आहे. ही संधी फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank) घेऊन आलीय. ज्येष्ठ नागरिकांसह इतर वयोगटातल्या नागरिकांसाठीही बँकेनं आपले व्याजाचे दर बदलले आहेत. फिनकेअर एफडी असणारे ग्राहक आपल्या बचतीवर जवळपास 8.51 टक्क्यांपर्यंत व्याज घेऊ शकतात, असं बँकेचं म्हणणं आहे. ज्येष्ठ नागरिक किमान 5000 रुपयांच्या ठेवीसह एफडीवर 9.11 टक्क्यांपर्यंत व्याज घेऊ शकतात, असं बँकेनं म्हटलंय. 25 मेपासून हे व्याजाचे दर लागू झाले आहेत. टीव्ही 9नं हे वृत्त दिलंय.

बँक शाखेसह ऑनलाइन पाहा माहिती 

एफडी सुरू करण्यास इच्छुक नागरिकांनी किंवा बँकेच्या ग्राहकांनी प्रत्यक्ष फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेला भेट द्यावी. किंवा इंटरनेट बँकिंगशी कनेक्ट व्हावे. मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करूनदेखील योजनेबद्दल अधिक माहिती घेता येणार आहे.

कधी आणि किती मिळणार व्याज?

  • फिनकेअर बँक बँक 7 ते 45 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी 3 टक्के व्याज दर देणार आहे. तर फिनकेअर एसएफबी (Fincare SFB) 46 ते 90 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी 4.50 टक्के व्याज दर देऊ करणार आहे. 
  • फिनकेअर एसएफबी 91 ते 180 दिवसांच्या एफडीसाठी 5.50 टक्के व्याजाचा दर ऑफर करेल. 181 ते 365 दिवसांच्या एफडीसाठी 6.25 टक्के व्याज दर ऑफर केला जात आहे.
  • 12 ते 499 दिवसांच्या महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरचा व्याज दर आता 7.50 टक्के असणार आहे. 500 दिवसांच्या महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरचा व्याज दर आता 8.11 टक्के आहे.
  • फिनकेअर एसएफबी 18 महिन्यांत, 1 दिवस ते 24 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर 7.80 टक्के व्याज दर देणार आहे. 
  • बँक 501 दिवस ते 18 महिन्यांत मुदत ठेवींवर 7.50 टक्के व्याजाचा दर ऑफर करेल
  • फिनकेअर एसएफबी 24 महिने, 1 दिवस ते 749 दिवस कालावधीच्या ठेवींसाठी 7.90 टक्के व्याजाचा दर देणार आहे. तर 750 दिवसांच्या कालावधीच्या ठेवींसाठी 8.31 टक्के व्याजाचा दर देणार आहे. 
  • पुढील 30 महिन्यांत आणि एक दिवस ते 999 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर आता 8 टक्के व्याजाचा दर मिळणार आहे. पुढच्या 751 दिवस ते 30 महिन्यांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या गुंतवणुकीवर आता 7.90 टक्के व्याज मिळणार आहे. 
  • फिनकेअर एसएफबी 1001 दिवस ते 36 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 8 टक्के व्याजाचा दर देणार आहे. बँक 1000 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 8.51 टक्के व्याजाचा दर देईल.
  • फिनकेअर एसएफबी 42 महिने 1 दिवस ते 59 महिने 7.50 टक्के व्याजाचा दर देईल. 36 महिने ते 42 महिने ठेव कालावधीसाठी 8.25 टक्क्यांची हमी बँक देत ​​आहे.
  • 59 दिवस आणि 66 महिन्यांच्या दरम्यान मॅच्युअर झालेल्या एफडीवर आता 8 टक्के व्याज मिळणार आहे. 66 ते 84 महिन्यांच्या दरम्यान मॅच्युअर झालेल्या एफडीवर आता 7 टक्के व्याज मिळणार आहे.

बँकेच्या विविध सेवा

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ही देशातली अग्रगण्य लघु वित्त बँकांपैकी एक आहे. चालू आणि बचत खाती, गोल्ड लोन, प्रॉपर्टी लोन, होम लोन, एफडी आणि आरडी, ओव्हरड्राफ्ट आणि स्मॉल लोन यासारख्या सुविधा बँकेमार्फत दिल्या जातात. भारतात बँक तिच्या मोबाइल अ‍ॅप, व्हाट्सअ‍ॅप बँकिंग त्याचप्रमाणे यूपीआय (UPI), एईपीएस (AePS), आयएमपीएस (IMPS), एनएसीएच (NACH) अशा विविध पेमेंटच्या पर्यायांच्या माध्यमातूनदेखील सेवा देत असते.