• 05 Jun, 2023 18:36

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fixed Deposit : 5 वर्षांची FD एका वर्षात मोडली तर त्यावर कोणता व्याजदर लागू होतो?

Fixed Deposit

Fixed Deposit : FD ची मुदतपूर्व पूर्तता कमी व्याज मिळवते, यासोबतच व्याजावर दंडही भरावा लागतो. एफडी तोडल्यावर, बुक केलेल्या दराऐवजी कार्ड दराने व्याज दिले जाते.

Fixed Deposit : फिक्स्ड डिपॉझिटवर लोकांचा विश्वास वर्षानुवर्षे कायम आहे. लोक दोन कारणांसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करतात. पहिली म्हणजे कमी जोखीम आणि दुसरी उत्तम परतावा. FD चा आणखी एक फायदा म्हणजे गरज भासल्यास तुम्ही तुमचे पैसे कधीही त्यातून काढू शकता, यालाच  FD Premature Withdrawal म्हणतात. मुदतपूर्व FD तोडण्याचे काही तोटे आहेत, असे केल्याने व्याज कमी असेल तिथे penalty द्यावी लागते. तर जाणून घेऊया मुदतपूर्व FD मोडल्यास कोणता व्याजदर लागतो?

मुदतपूर्व FD मोडल्यास कोणता व्याजदर लागू होतो?

प्रत्येक बँकमध्ये मुदतपूर्व FD मोडल्यास penalty ची वेगळी रक्कम द्यावी लागते. penalty एकूण रकमेवर नव्हे तर मिळालेल्या व्याजावर आकारली जाते. जर तुम्ही मुदतीपूर्वी एफडी तोडत असाल, तर तुम्हाला एफडी खाते ज्या दराने ओपन केले होते तो व्याजदर लागू होणार नाही, त्याला Booked Rate म्हणतात. एफडी तोडल्यावर, बुक केलेल्या दराऐवजी कार्ड दराने व्याज दिले जाते. कार्ड रेट म्हणजे ज्या कालावधीनंतर FD मोडली गेली आहे, त्या कालावधीसाठी बँक FD वर जे व्याज देत आहे, तेवढेच व्याज दिले जाईल. यासोबतच त्या व्याजावर दंडही आकारण्यात येतो. 

1 वर्षात FD तुटल्यास किती नुकसान होऊ शकते? 

FD चा कालावधी 5 वर्षांचा असतांना जर तुम्ही एक वर्षानंतर FD मोडली तर किती नुकसान होईल? उदाहरण घेऊन समजून घेऊ. तुम्ही 1 लाख रुपये FD मध्ये 5 वर्षासाठी गुंतवले. त्याचा व्याजदर 7 टक्के दराने ठरलेला होता, पण जर तुम्ही एक वर्षाच्या नंतर FD मोडणार असाल तर तुम्हाला कार्ड रेट प्रमाणे व्याजदर लागू होईल. तो कमी असू शकतो. म्हणजेच कार्डच्या दरानुसार तुम्हाला 6 टक्के व्याज मिळेल. 

आता या 6 टक्के व्याजावरही तुम्हाला 1 टक्के दंड भरावा लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला फक्त 5 टक्के प्रभावी व्याज मिळेल. तर, जर तुम्ही 5 वर्षांनंतर पैसे काढले असते, तर तुम्हाला वार्षिक 7% दराने 7000 रुपये व्याज मिळाले असते. दुसरीकडे, प्री-मॅच्युअर विथड्रॉवलवर तुम्हाला 5 टक्केनुसार फक्त 5 हजार रुपये मिळतील.

पंजाब नॅशनल बँक मुदतपूर्व FD मोडल्यास दंड आकारणार नाही 

पंजाब नॅशनल बँक सुगम मुदत ठेव योजनेतील गुंतवणूकदारांनी मुदतपूर्व पैसे काढल्यास कोणताही दंड किंवा शुल्क आकारणार नाही. PNB तिच्या ठेवीदारांना मुदतपूर्तीपूर्वी कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी देते. PNB ने अलीकडेच जाहीर केले की, PNB सुगम मुदत ठेव योजनेंतर्गत प्रति ग्राहक कमाल गुंतवणूक मर्यादा 10 लाख रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. PNB च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, FD ठेव पावतीचे मूल्य (मूळ रक्कम) त्यानुसार कमी केले जाईल. जर एखाद्या गुंतवणूकदाराला मुदतपूर्तीपूर्वी संपूर्ण ठेव रक्कम काढायची असेल, तर कोणताही दंड आकारला जाणार नाही.

Source: hindi.news18.com