Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger Stock: 35 पैशांच्या शेअर्सची किंमत झाली , 554 रुपये!

Multibagger Stock SEL Manufacturing Company:

Profit-Making Stock: गेल्या सहा महिन्यांपासून या कंपनीची स्थिती काहिशी ठिक नाही, शेअर्सही विकले जात आहेत. या कालावधीत स्टॉक 41.42 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र ज्यांनी सुरुवातीला स्टॉक घेतला असेल, आज त्या व्यक्ती फायद्यात आहेत, नेमका तपशील पुढे वाचा.

Story of SEL Manufacturing Company: सेल मॅन्युफॅक्चरींग (SEL Manufacturing) या कंपनीने अवघ्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना लक्षाधीश बनवले आहे. यामुळे या कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर (multibagger stock) ठरले आहेत. या कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत 1 लाख 58 हजार 185 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून शेअर विक्री होत असल्याने, स्टॉक 41.42 टक्क्यांनी घसरला आहे. सोमवारी, एनएसईवर (NSE) 5 टक्क्यांनी घसरत, 554.10 रुपयांवर बंद झाला.

सेल मॅन्युफॅक्चरींग (SEL Manufacturing) ही वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीची स्थापना 2000 सालात झाली होती. सध्या कंपनीचे संचालक नीरज सलुजा आहेत. तंभी मॉडर्न स्पिनिंग मिल्सची ही कापड निर्मितीची उपकंपनी आहे. हे विविध प्रकारचे तंतू आणि धागे कातणे आणि विणण्याच्या व्यवसायात आहेत. कंपनी कापूस आणि धाग्याच्या व्यापारातही आहे. कंपनीचे एकूण मूल्यांकन (बाजार मूल्य) 37 कोटी रुपये एवढे आहे. कंपनीने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षीचे एकूण उत्पन्न 534.504 कोटी होते. कंपनीने  एकूण विक्री 459.11 कोटी रुपयांची केली होती. कंपनीचा निव्वळ नफा 235.965 कोटी होता.

स्टॉक 862.25 वर पोहोचला (The stock hit 862.25)

सेल मॅन्युफॅक्चरींग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या (SEL Manufacturing) शेअरच्या किमतीच्या पार्श्वभूमीनुसार, एनएसईवर (NSE) 9 जानेवारी 2023 रोजी 35 पैशांनी वाढून 554.10 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत कंपनीच्या समभागाने सुमारे 1 लाख 58 हजार 185.71 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक 80.71 टक्क्यांनी वाढला आहे.

गुंतवणुकदार झाले करोडपती! (Investors became millionaires)

सेल मॅन्युफॅक्चरींग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या (SEL Manufacturing Company Ltd)  शेअरच्या किमतीच्या इतिहासानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये 35 पैशांनी गुंतवले असते, तर आज ही रक्कम सुमारे 16 कोटी रुपये झाली असती. मात्र सध्या कंपनी कर्जात बुडाली आहे आणि तिचा व्यापारही गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता.